टाळेबंदीमूळे कोट्यावधी लोक बेकारीच्या खाईत
कोल्हापूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडने सारा देश पोखरुन टाकला, महाराष्ट्राचे जनजिवन विस्कळीत केले. टाळेबंदीमूळे उत्पनाचे स्त्रोत बंद झाले. हजारो कामगार बेकार झाले. अनेक कारखानदार उद्योजकानी कामगार कर्मचार्यानाही सेवेतून काढून टाकले. अघोरी जीएसटी करामुळे अनेक कामगार कर्मचार्यावर बेकारीची कुर्हाड कोसळली होती. त्यात कोरोना कोविडचा हैदोस यामुळे कामगार असंघटीत कामगार मजूरांची ससेहोलपट होत असून कामगार मजूरांना कामाविना भुकबळीची वेळ आल्याने मरणास्तव जगावे लागते. विशेष म्हणजे केंद्र सरकारने अर्थव्यवस्था बळकटीसाठी जे कोट्यावधी रुपयाचे पॅकेज त्यात कामगार मजूरासाठी कांही उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे बोलले जात आहे.
भारतातील महाराष्ट्रातील उद्योग धंदे बंद पडल्याने बेकारी वाढली असून संबधीत संस्थेने केलेल्या संशोधनात देशभरातील किमान वीस कोटी पेक्षाही जास्तीचे लोक कामगार मजूर कर्मचारी बेकार झाले असून त्यांच्याकडे जगण्यासाठीचा दुसरा कोणताही पर्याय नसून शासनाच्या पर्यायी व्यवस्थेवरच अवलंबून असल्याचे मत अनेक कामगार मजूरांनी सर्व्हेक्षण करणार्याना सांगीतल्याचे बोलले जात असल्याने कामगार मजूराचे असे हाल असतील तर देशाची अर्थव्यवस्था कशी बळकट होईल अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.