वादळी वारा आणि आकाशात विजा चमकत असल्यास हे करा (Do’s)
लातूर (जिमाका) : आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.
जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या. झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे. वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे. मजबूत असलेले पक्के घात हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे त्यामुळे अशा ठिकाणी आसरा घ्या. खुल्या आकाशाखाली असल्यास आणि जवळ कोणतेही सुरक्षित ठिकाण नसल्यास अशा परिस्थितीत खोलगट ठिकाणी रहा. वीज पडल्यास प्राथमिक उपचारा करीता मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत. लिफ्टचा वापर टाळावा. इलेक्ट्रीकल पॅनल्स पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
*आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका (Don’ts):*
1. पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.
2. विजेच्या/टेलिफोनच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.
3. दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. चारचाकी वाहनात असाल तर वाहनाच्या खाली उतरू नका.
4. धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
5. गाव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपण घालू नका. कारण ते विजेला आकर्षित करतात.
6. धातूचे उपकरणे उदा. कुदळ, खोरा, लोखंडी टोपले ई. सोबत बाळगू नये.
7. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका.
जी. श्रीकांत (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर