लातुर ६६ पैकी ६० निगेटीव्ह  ०६ पॉझिटिव्ह

लातुर ६६ पैकी ६० निगेटीव्ह  ०६ पॉझिटिव्ह


.
      लातूर (जिमाका) ः विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक ०३.०६.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ६६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ०४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी  ०२ व्यक्ती रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील असुन त्या ७ दिवसांपूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत. तसेच ०१ व्यक्ती औसा तालुक्यातील हिप्परगा येथील असून त्यांनी मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे व ०१ व्यक्ती केदार नगर औसा येथील असून ती व्यक्ती सोलापूर येथून प्रवास करून आलेली आहे. कोविड केअर सेंटर लातूर येथून ३७ व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती संभाजी नगर लातूर येथील रहिवाशी आहेत. अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील ०१ व्यक्ती मागिल ११ दिवसापासून या रुग्णालयात उपचार घेत  होती त्या व्यक्तीला  पूर्वीपासूनच ह्रदयाचा आजार होता व त्याचा कोरोना (कोविड१९) मुळे मृत्यू झाला आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ०३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच ०३ व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत. 
निलंगा ०१, चाकूर ०२, देवणी ०१  असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातूर जिल्ह्यातून एकूण ६६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

लोकप्रिय बातम्या