सहा वर्षाच्या मुलीने केली कोरोनावर मात*

लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक दिवस*


*जिल्ह्यात आज 18 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला*


*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय 13, अहमदपूर 3 व उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 2 रुग्णांना डिस्चार्ज*


सहा वर्षाच्या मुलीने केली कोरोनावर मात*


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 44, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 व मृत झालेल्या रुग्णांची संख्या 4*


*जिल्ह्यातील सर्व 28 व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट निगेटिव्ह*


      लातूर, दि.4(जिमाका): आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 रुग्ण, अहमदपूर येथून 3 रुग्ण व उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील दोन रुग्ण असे एकूण जिल्ह्यातून 18 रुग्णांना त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला असून आजचा दिवस लातूरकरांसाठी मोठा दिलासादायक ठरलेला आहे व लातूर जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. सर्वच्या सर्व 28 व्यक्तींच्या स्वाबचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.


     उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून उदगीर शहरातील हनुमान कट्टा येथील दोन रुग्ण त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना आज रुग्णालय प्रशासनाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला. मांडणी तालुका अहमदपूर येथील तीन रुग्ण अहमदपूर येथील रुग्णालयात उपचार घेत होते व त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील आज दिनांक 04 जून 2020 रोजी एकुण 13 रुग्णांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली असुन हे सर्व रुग्ण 06 ते 65 वर्षे वयोगटातील आहेत. एकुण 13 रुग्णांपैकी ०9 रुग्णांना कोविड-19 निमोनियाची लक्षणे होती व गंभीर स्वरुपाचा आजार होता. यातील एक रुग्ण ०७ दिवस व्हेंटीलेटर सपोर्टवर होता. मागील 05 ते 06 दिवसापासुन या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसुन आली नसल्यामुळे आय. सी. एम. आर. च्या नविन प्राप्त डिस्चार्ज् (रुग्णांना घरी सोडण्याच्या) मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आले. त्यातील ०७ व्यक्तींना Home Quarantine व ०६ व्यक्तींना Institutional Quarantine करण्यात येणार आहे. यातील 06 रुग्ण लातुर शहरातील व 06 लातुर जिल्हयातील ग्रामीण भागातील असुन ०१ रुग्ण उस्मानाबाद जिल्हयातील आहे. तसेच यामध्ये ०६ वर्षाची एक मुलगी असुन तीने सुध्दा कोरोना वर मात केली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


या रुग्णांवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, डॉ. मंगेश सेलुकर उप अधिष्ठाता, डॉ. उमेश लाड उप अधिष्ठाता, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. निलिमा देशपांडे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र, डॉ. शिवप्रसाद मुंदडा प्राध्यापक व बालरोग विभाग, डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन हलकंचे, डॉ. राम मुंढे, डॉ. विनायक सिरसाठ, डॉ. दिपक कोकणे, डॉ. किरण डावळे, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. राजेश बोबडे, डॉ. प्रविण भगत, डॉ. शाम तोष्णीवाल, डॉ. निलेश नागरगोजे, डॉ. अभिजित यादव, डॉ. उमेश बिराजदार, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. गणेश पवार, डॉ. सचिन राठोड, डॉ. रविभूषण कासले, डॉ. कांचन जाधव, डॉ. किशोर जाधव, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. चेतन आद्रट, डॉ. विनोद खेडकर, डॉ. बालाजी आद्रट, डॉ. प्रणिता पाटील, डॉ. अनिल बोगुलवार, डॉ. लक्ष्मण सरकुंडे, अधिसेविका श्रीमती अमृता पोहरे, श्री. डी. व्ही. तेलगांवकर स्वच्छता निरीक्षक, तसेच सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, वर्ग ४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या