संपादकीय...
केंद्राला करणी, राज्याला भानामती !
केंद्र व राज्य सरकारातील आमजनतेचा सर्वांगीण विकास, नगारीकांच्या समस्या सोडवायच्या असतील त्याच राज्य, केंद्राची सर्वकष क्षेत्रातील भौतीक विकास साध्य करुन विकासासह आर्थीक उन्नती करायची असेल तर तशी सत्ताकांक्षी नेतृत्वाची इच्छाशक्ती महत्वाची असते आणी तीच नसेल उणे-दुणे काढूनच सत्ताकारण करण्यात सत्तापदाचा कार्यकाळ संपत असतो याचे भान ठेवून सत्ताधारी-विरोधकानी सहकार्य व सहभागातून केंद्र व राज्य कारभार चालविला तर जैसी करणी वैसी भरणी हे मतदाराचे टोमणे सहन करण्याची वेळ राजकारणी, लोकप्रतिनिधीवर येवूच शकत नाही हे वास्तव नाकारुन चालत नाही.
समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सत्ताकारणात नेहमीच अडचणी येत असतात. त्या नव्या नाहीत पंरतू त्या अडचणी, समस्याचा बाऊ करुन जनतेची दिशाभूल करुन सत्ताकारण करीत राहणे परवडणारे नसते. आजघडीला सार्या जगालाच कोरोना, कोविड १९ या महामारी रोगाने ग्रासलेले आहे त्यात भारत आणी भारतातील राज्येही पोखरली जात आहेत. कोरोना, कोविडचा फैलाव रोखून या महामारी रोगाचे निर्मूलन करावे या उदात्त हेतून केंद्र व राज्य शयासनाने लॉकडाऊन जारी केले. सारे उद्योग धंदे, कारखाने बंद पडले, कामगार, मजूर बेरोजगार झाली त्यांची उपासमार होऊ लागली. उत्पन्नच नसेल तर सरकारी महसूल,कर तरी कोठून व कसा भरणार हा प्रश्न शेतकरी, कारखानदार, उद्योजकात भेडसावणाराच होता त्यामूळे राज्य सरकारसह केंद्र सरकारची तिजोरी रिकामी होत गेली. केंद्र व राज्य शासनाकडे ऐनवेळी उद्भवलेल्या समस्याचे निराकरण करणेसाठी आपत्तीकालीन निधी असतो त्या निधी खर्चातून सर्वकांही निराकरण करावे लागते हे शासकाचे, प्रशासनाचे आद्यकर्तव्यच असते हे कोणी गैर मानीत नाही.
भुकंप, अतिवृष्टी, अग्नीकांड, प्रलय असे अनेक संकटे राज्य व केंद्रात अचानकच येत असतात. त्यातच कोरोना, कोविड या महामारी रोगाचे संकट आले आणी पारदर्शक कारभार, सर्वांगीण विकास, नागरी समस्या, आर्थीक उन्नतीचे केंद्र व राज्य सरकारचे स्वप्न भंगले (तसे असेल तर) आणी कोरोना-कोविड या विषारी, विषाणू जिवघेण्या रोगाने सार्या जनतेला भयभीत करुन लॉकडाऊनमध्ये घरा, दारात कोंडवून ठेवले. प्रत्येक नागरीकांचा जीव बंद दरवाजा असलेले दारावर मृत्यूची कधी थाप पडेल कधी अवचित घंटा वाजेल आणी आपल्या शरीराचे होत्याचे नव्हते होईल याच भितीत जगत होता. त्यात गोरगरीब, सामान्य माणूस, कामगार, मजूर, कष्टकरी, बारा बलूतेदाराचे हाल तर शब्दात बसूच शकत नाहीत असे आकांती जीवन ते जगत होते आणी पा, सहा महिण्यानंतर कोरोना कोविड निर्मूलनासाठी लादलेले लॉकडाऊन शिथील झाले, उठले जनजीवन सुरळीत होत असतानाच आमजनतेच्या समस्याचे निवारण करणेसाठी अर्थव्यवस्थेचा बागूलबूवा समोर करुन ता....थैंय्या करीत केंद्र व राज्य सरकार एकमेकाकडे बोट दाखून सर्वसामान्य जनतेची चेष्टाच करीत असल्याचे भासत असल्याने जगण्यातच मरण भोगावे लागते की काय अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
कोरोना-कोविड निर्मूलन काळात लादलेले लॉकडाऊन शिथील होताच महाराष्ट्र शासनाच एवढा महसूल जमा झाला. केंद्राकडे भरणा एवढा झाला राज्य व केंद्राचा आर्थीक कणा मजबूत होतो आहे अशा बातम्या येत होत्या. सद्यःपरिस्थितीत ऑनलॉक झाल्याने सर्व व्यवहार जनजीवन सूरळीत होत आहे. त्यामूळे महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारे केंद्राकडे जीएसटी करातील परतावा द्यावा, राज्यना आर्थीक पॅकेज द्यावे अशी मागणी करीत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यानी देवाच्या करणीमूळे देशाची अर्थव्यवस्था कोडमडली म्हणून शक्यतो निधी राज्याना देवू शकत नाही किंवा आर्थीक पॅकेज देणे शक्य नाही म्हणून सारेकांही देशावर सोडून दिले तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यानी केंद्राकडून बावीस हजार कोटी रुपये येणे आहे बाकी येणे सोडा म्हणून कळत न कळत भानागड की भान नसलेली मतीच (भानामती) जनतेसमोर ठेवून सत्तकारणाचे हसूच करुन ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे.
लोकशाही धर्मनिरपेक्ष भारताचे अर्थकारण अर्थमंत्री निर्मला सितारमण हे कोणत्या देवाच्या सांगण्यावरुन करतात हे स्पष्ट केलेले नाही यामूळे निर्मला सितारमण यांचा देव राम की राममंदीराची पायाभरणी करणारे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आहेत या संदर्भात चविष्ट चर्चा होत असून महाष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार हे शेतकर्याना, कारखानदाराना भरभरुन देतात. कोविडग्रस्त मृताना मदत जाहिर करतात. कोट्यावधी रुपयाचे पॅकेज जाहिर करतात मग सर्वसामान्य जनतेच्या रोजगारासाठी, व्यवसाय उभारणीसाठी, महाविद्यालयीन मागासवर्गीयाना शिष्यवृती देण्यासाठी, समाजकल्याण खात्यातील कर्मचारी पगारासाठी, वस्तीगृहे चालविण्यासाठी किंवा मागासवर्गीय अधिकारी कर्मचार्याना पदोन्नती दिलीतर पगारात वाढ होईल म्हणून हा सारा खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा कसा काय नाही, केंद्र, शासन आंधळे कसे होते. कोरोना कोविड निर्मूलनासाठी केंद्र राज्य शासनाला आलेला कोट्यावधी अब्जावधी रुपयाचा निधी कोठे गेला की केंद्र व राज्य सरकारकडील आपत्ती व्यवस्थापना निधीसह लोकनिधीही देवाची करणी आणी भानामतीनेच गडप, गारद केला काय अशीच उलटसूलट चर्चा देव, देवीसह मरेआई, सटवाई, भूत, भुताटकी, हैवाण, गैवाणात होत असून राक्षस, भक्षक, भस्मासूर, सत्ताविर मात्र उधळ्या डोळ्याने पाहात असावेत अशीच चर्चा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसते आहे. ती चर्चा व्यर्थ न जावे हीच देवाच्या करणीपुढे आणी भानामतीच्या चरणी अपेक्षा करीत असल्याचा लोकडांगोरा पिटत असल्याचे कानी पडते आहे. देव सत्ताभव् आणी लोकमरण भव हाच जप होत असल्याचे दिसते तेच वास्तव असावे.