लोकप्रतिनिधीच्या अहंकार व हेवादाव्यामूळे लातूरचा विकास अडगळीत कशासाठी
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहर व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे. तो कॉंग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमूख यानीच केलेला आहे. लातूरकरानी जे मागीतले आणी जे मागीतले नाही ते सर्व कांही भरभरुन दिलेले असताना केवळ अहंकार आणी मी की तू या हेव्यादाव्यापोटी लातूर शहर व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अडगळीत पडतो की काय आणी कशासाठी अशीच उलटसूलट चर्चा जिल्हाभरात होताना दिसते आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे तर भाजपा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. दिवंगत विलासराव देशमूखांचे लातूर अशी ओळख असल्याने राज्य सरकार किंवा केंद्र सरकार लातूरसाठी दुजाभाव करणार नाही अशीच चर्चा होते आहे. केंद्र सरकारात लातूर लोकसभा राखीव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे सुधाकर शृंगारे करीत आहेत तर लातूरचे पालकमंत्री अमित देशमूख असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे संजय बनसोडे हे राज्य मंत्री असल्याने विकासात्मक योजना, प्रकल्प राबविण्यासाठी कसलीच अडसर नसताना आहे त्या शासकीय संस्था, कार्यालये, खाजगी संस्था, शहरी,ग्रामीण भागातील रस्ते विकास, विजपूरवठा, पाणी पुरवठा, शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न सोडविण्यासाठी याना वेळ कशासाठी मिळत नाही अशी चर्चा होत असली तरी मी की तू या हेव्यादाव्यातून विकासाची गती खूंटल्याची चर्चा होताना दिसते आहे.
अहमदपूर, चाकूर, मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील तर निलंगा व औशाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार हे भाजपाचे आहेत. तर लातूर ग्रामीनचे धिरज देशमूख हे आमदार असून भर म्हणून भाजपाचेच रमेशप्पा कराड ही आमदार असल्याने केवळ श्रेयासाठी लातूर शहर व जिल्ह्याचा विकास अडगळीत पडत असेल तर मेरे आंगणे मे तेरा क्या काम अशी वेळ आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत आल्याशिवाय राहाणार नाही अशी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
लातूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय चळवळीचा बालेकिल्ला आहे. विकासासाठी सहमती व सहभागातूनच आजवरचा विकास साध्य झाला आहे. विलासराव देशमूख यानी हे गुपीत ओळखूनच सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या साक्षीने विकास साधला जात आहे. तो गुण आजच्या लोकप्रतिनिधीत का नाही अशी ही शंका व्यक्त केली जात आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधीच्या अहंकार व हेव्यादाव्यामूळे लातूरचा विकास अडगळीत पडला असून सर्वसामान्य कार्यकर्ते, पत्रकार आणी नागरीकाना शासकीय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणी पोलीस यंत्रणेसमोर अपयश स्विकारावे लागते आहे. याचा जाब कोणता लोकप्रतिनिधी विचारील अशीही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.