समाजकार्यातील विद्यार्थ्यांनी “बार्टी” द्वारा आयोजित नेट/सेट पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन व्याख्यानांची मालिका.गरजू विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन.

      लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून बार्टीचे महासंचालक मा. सुनील वारे आणि विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रकल्प अधिकारी अँड. राजीव गांधी यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी नेट/सेट पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन मे 2023 पासून बार्टीच्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले आहे. यासाठी समाजकार्य विषयातील तज्ञ, अभ्यासू, नेट/सेट उत्तीर्ण, पि.एच.डी.प्राप्त आणि अनुभवी प्राध्यापकाद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये प्रोफेसर डॉ. देवानंद शिंदे (पुणे), डॉ. गौतम पाटील (मुंबई) आणि डॉ. संजय गवई (लातूर) आदि तज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. याचा महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या गरजू विद्यार्थ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे.
       या ऑनलाइन व्याख्यानामध्ये समाजकार्य विषयातील एकूण दहा विषयाचा अंतर्भाव असून समाजकार्याचे स्वरूप आणि विकास, समाज, मानवी वर्तन आणि समुदाय, वैयक्तिक आणि गटासोबतचे समाजकार्य, समुदायासोबतचे समाजकार्य आणि सामाजिक कृती (चळवळ), संख्यात्मक आणि गुणात्मक समाजकार्य संशोधनाचे विविध दृष्टिकोन, प्रशासन, कल्याण आणि विकासात्मक सेवा, सामाजिक धोरण, सामाजिक नियोजन आणि सामाजिक विकास, भारतीय संविधान, सामाजिक न्याय, मानवी अधिकार आणि समाजकार्य, समाजकार्याचे क्षेत्र भाग ०१  आणि ०२ आदि विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने बार्टीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. तेव्हा आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्याख्यानाचा लाभ घेऊन येणाऱ्या यूजीसी सेट/नेट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.  

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या