*मुक्तीसंग्राम हा जगाच्या इतिहासात नोंद होणारा सशस्त्र लढा*

      लातूर   ( जिमाका ) : स्वामी रामानंदतीर्थ या संन्यासी योद्ध्याने वैचारिक बैठक दिलेला आणि खेड्यापाड्यांतील सामान्य माणसांनी दिलेला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असा सशस्त्र लढा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि मुक्तीलढ्याचे अभ्यासक जयप्रकाश दगडे यांनी येथे  व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना केले.
     श्री श्री रविशंकर विद्यामंदिरामध्ये  'मराठवाडा मुक्तीसंग्रामाची शौर्यगाथा ' विषयावर ते बोलत होते. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,  जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाऊण्डेशन, लातूर यांच्या संयुक्त वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन जिल्हाभर विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये करण्यात आले आहे.
    या व्याख्यानास  संस्थाचालक राजेंद्रजी कोळगे, जिल्हा समन्वयक दिलीप कानगुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली कुलकर्णी, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विनया मराठे,उपमुख्याध्यापिका सुलभा जोशी यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. दगडे यांनी मुक्तीस॔ग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विस्ताराने स्पष्ट करीत आजवर प्रकाशात न आलेल्या, मुक्तीलढ्यातील क्रांतीकारक स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्यकथा नाट्यमय पद्धतीने सांगून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. मुक्तीसंग्रामात लातूर जिल्ह्याचे खूप मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. 
शेवटी प्रशालेच्या वतीने झालेल्या  आभारप्रदर्शनाने  कार्यक्रमाची सांगता झाली.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या