काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षपदी शिवाजी पाटील लगळूदकर यांची नियुक्ती


काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षपदी  शिवाजी पाटील लगळूदकर यांची नियुक्ती 
      भोकर / सिध्दार्थ जाधव/ भोकर तालुक्यातील कॉंग्रेस आय कमिटीची तालुका ,शहर , युवक ,अल्पसंख्याक  कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रणित अधिकृत उमेदवार मा. आमदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षपदी बाजीराव ऊर्फ शिवाजी पाटील लगळूदकर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.
       महाविकास आघाडीच्या वतीने नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी माजी आ. वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने   भोकर येथे दिनांक २९ रोजी दुपारी ३ वाजता माऊली मंगलकार्याल ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रणित अधिकृत उमेदवार तथा माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते तालुक्यात मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षातील कार्यकाळात गेल्या अनेक वर्षांपासुन काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारे बाजीराव ऊर्फ शिवाजी पाटील लगळूदकर यांना काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षपदाचे यांच्यासह विविध पदी निवड करण्यात आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत.
        जिल्हा कार्याध्यक्ष बी आर कदम
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बबनराव बारसे, जिल्हा कार्याध्यक्ष मा. सभापती बाळासाहेब रावणगावकर,माधवराव पाटील शेळगावकर,काँग्रेस तालूकाध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील ,महिला जिल्हाध्यक्ष रेखा ताई चव्हाण, मा.जीप.सदस्य  प्रकाशराव भोसीकर,माधवराव पाटील मातुळकर,प्रवक्ता बालाजी गाडे,पप्पू कोंडेकर,राष्ट्रवाद काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.शिवाजी कदम,शिसेनेचे तालुका प्रमुख संतोष आलेवाड काँग्रेस शहराध्यक्ष तौसीफ इनामदार,शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवर, गिरीश कदम,ऍड. सतिश कुंटे,राष्टवादीचे उमेश कापसे, माधव शिंदे, राहुल कोंडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या