सदरची विशेष शोध मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांचेकडून यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. पोलीस दलातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा शोध घेण्यात यश आल्याने समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लातूर पोलिसांची विशेष शोध मोहीम २७६ जणांचा शोध घेण्यात यश.*
लातूर : महाराष्ट्र शासनाचे १०० दिवसाचे कृती कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हा पोलीस दला कडून लातूर जिल्ह्यातील सन २०२० पासून हरवलेले प्रौढ पुरुष व महिला तसेच पळवून नेलेले गुन्हे नोंद झालेले अल्पवयीन मुले व मुली यांची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली असून या शोध मोहिमेत २७६ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर विशेष शोध मोहिमे दरम्यान लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग प्रकरणातील ९२ पुरुष व १४४ महिला असे एकूण २३६ प्रौढ व्यक्ती, तर पळवून नेलेले दाखल गुन्ह्यातील ३५ अल्पवयीन मुली व ५ अल्पवयीन मुले अशी एकूण ४० अल्पवयीन बालके असे एकूण २७६ जणांना शोधण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. सदर शोध मोहिमेत स्थानिक पोलीस स्टेशनचे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांचे पथकांकडून कडून शोध मोहिमे दरम्यान राज्यात तसेच परराज्यात विविध ठिकाणी पथके पाठवून शोध घेण्यात आला आहे.
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...
-
लातूर, (जिमाका) : महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...