*लातूर पोलीस दलाच्या वतीने खाजगी सावकारी विरोधात तक्रार निवारण दिन*

       लातूर  (पोअका) : वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेकजन इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खाजगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेवून सावकारीच्या विळख्यात फसतात मग सावकाराच्या वसुलीचा सामनाही करावा लागतो. यातुनच मग सावकाराकडून कर्ज वसुल करताना विनयभंग, सावकाराला घाबरून आत्महत्या, चरितार्थाचे साधन सावकाराकडून घेवून जाणे, सावकाराकडून घेतलेल्या पैशातुन जुगार, व्यसनातून नैराश्याच्या गर्तेत अडकणे असे प्रकार घडतात परंतु सर्वसामान्य माणुस कर्जाच्या डोंगराखाली दबून जातो.
           यासाठी अवैध सावकारीमुळे पिडीत *लातूर शहरातील नागरीकांसाठी* लातूर पोलीस दलाच्या वतीने दि.१९/०४/२०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०२.३० वा चे दरम्यान विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, लातूर याठिकाणी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आलेला आहे.
        आपण खाजगी सावकारीमुळे पिडीत असाल तर आपल्या तक्रारीसह विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, लातूर येथे उपस्थित रहावे असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे...

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या