संपादकीय...
प्रधानमंत्री मोदी उवाच
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची दुसरी फेरी आहे. प्रधान मंत्री म्हणून देशासाठी, जनतेसाठी सर्वांगीण विकासासाठी काय केले आहे, काय बाकी आहे, याचा पाढा वाचण्याची ही वेळ नाही, पण प्रधान मंत्री म्हणून कालपरवा जे कांही मन की बात मधून मन मोकळे केले आहे, त्यावरुन ते भारत देशाचे पालक आहेत. आसा भास नव्हे, वास्तव वाटते.
महाभंयकर कोरोना रोगाने देशाला वेढले आहे. साहजीकच नरेंद्र मोदी हे प्रधान मंत्री असले तरी प्रथमतः एक माणूस एक भारतीय आहे, म्हणून त्यांचे र्हदय पिळवळून निघने साहजीकच आहे, यात संदेह नाही. मन की बात मधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत असे वाटत होते. पण त्यांचे शब्द कानी पडताच एक सच्चा नागरीक, एक लोकप्रतिनिधी बोलतोय असेच वाटत होते. कारण बोलण्यात तमाम भारतीयांशी एक नाते आपुलकी जिव्हाळा जाणवत होता.
प्रारंभी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी महाभंयकर विषारी कोरोना रोगाचा भारतात फैलाव होवू नये म्हणून नागरीकावर विसंबून राहूनच जनता संचार बंदी लागू केली. असे स्पष्ट करुन वरचेवर कोरोना रोग पसरत आहे. हे लक्षात येताच त्यात नागरीक आडकू नयेत यासाठी लॉकडाउन लागू केले. हा कठोर निर्णय मान्य आहे. पंरतू यामुळे कोरोनाचे विषारी जंतू लोकापर्यंत पोंहचू नयेत आणि जनता सुखी राहवी हाच हेतू आहे. असे स्पष्ट करुन झालेल्या आणि होत असलेल्या बंदी त्रासामूळे नागरीकांची दिलगीरी व्यक्त करुन लॉकडाउनची गोरगरीबांना अडचण झाली आहे, हे मी समजू शकतो, पण जनतेच्या रक्षणासाठी दुसरा कोणता पर्याच नव्हता म्हणून असा हा कठोर निर्णय घ्यावा लागला असे ही प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून जनतेला होणार्या त्रासाची कबूली देवून लॉकडाउनचे समर्थन केले, यात वावगे असे कांही नसावे असे वाटते.
कोरोना रोगाचा पाडाव करण्यासाठी संशयीत व बाधीत रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, परिचारीका, वैद्यकीय कर्मचारी, शहरी, ग्रामीण भागात कोरोना रोगा विषियी जनजागृती करुन कोरोना हटाव मोहीमेत सहभागी झालेले आघाडीचे सैनिक यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे असेच असून लॉकडाउनची घालून दिलेली लक्ष्मण रेषा आम जनतेनी ओलांढू नये असे अहवान ही नरेंद्र मोदी यांनी केल्याने नागरीकात कोरोनाशी दोन हात करण्यासाठीची क्षमता निर्माण झाल्याचे दिसते आहे.
भयावह अशा कोरोना रोगाने सार्या जगाला कब्जात घेतले आहे. जगाचा आढावा घेताना कोरोना रोगाचा प्रभाव भारतात म्हणावा तसा नाही. यातच तमाम भारतीयाचे आरोग्य धोक्या बाहेर असून केवळ संसर्गाची काळजी घ्यावी, घरा बाहेर पडू नये, लॉकडाउनचे पालन करावे, एवढेच नागरीकांची हाती असून देशभरातील वैद्यकीय तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी मनापासून रुग्ण सेवा करीत असून कोरोना प्रतिकारासाठी आरोग्य विभागा संशोधन केंद्र युध्द पातळीवर कोरोना मुक्तीसाठी लढा देत असल्याने आम जनतेने केंद्र शासनासह राज्य शासन आणि वैद्यकीय चमुला सहकार्य करावे हे काळाची गरज असल्याचे स्पष्टीकरण प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून केल्याने लोकप्रतिनिधी वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांचेसह नागरीकांना उर्जा मिळाली असल्याचे जाणवते आहे.
कोरोना रोगाचा मुकाबला, लॉकडाउन पालन, स्थानिक जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे सर्वांचे कर्तव्य असून एकमेकास सहाय्य करुन अवघेधरु सुपंथ या प्रमाणे कार्य करीत असताना कोरोना विरोधी लढाई करताना मानुसकी व मानवतेला आंतर देवून नका असे कळकळीचे अहवान प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असल्याने विषारी संसर्गजन्य कोरोना रोगाच्या निर्मूलनासाठी सहकार्य व सहभागातून वैद्यकीय क्षेत्रातला निश्चित यश मिळेल यात दुमत नसावे अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात प्रसंगी जे रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी गेलेत अशांची मुलाखत लोकांना ऐकविल्याने कोरोना व कोव्हीड १९ चा प्रतिकार कसा करावा या बाबतीत आम जनतेला लाभ होणार असून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी जे आत्मीक भान ठेवून जनतेला कोरोना मुक्त होण्यासाठी उर्जा दिली ती महत्वाची वाटते. कांहीही झाले गेले बोलले असले तरी आपणच आपला बचाव केला पाहिजे हे वास्तव नाकरुन चालत नाही. कारण आपण आपले वैद्यकीय अधिकारी व रक्षक आहोत, सेवाभावीचा फक्त आधारच आहे, असे समजून वैद्यकीय सल्ला व लॉकडाउन हाच आपला खरा विकल्प आहे, एवढेच.