जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था करावी

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था करावी



लातूर (लातूर प्रभात प्र.) ः विषारी कोरोना रोगाने सर्वसामान्य जनतेचे जिवन मृत्यूच्या काठावर आणून ठेवले आहे.  जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी रात्रनंदिवस कोरोना रुग्णाची सेवा करत आहेत.  लातूर शहरातील नागरीकावर ही पोलीस यंत्रणा लक्ष देवून आहे.  पंरतू मध्यवस्ती बाहेरील वस्त्या मधील रस्ते अरुंद असल्यामुळे चार चाकी पोलीसी वाहन जावू शकत नाही.  दुचाकी जाते, पण पोलीस संख्या कमी असल्यामूळे लातूर शहर नियंत्रणात ठेवणे त्रासीक झाल्यामूळे लातूर शहरावर लक्ष केंद्रीत करुन माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था करावी अशी मागणी जाणकार नागरीकातून होताना दिसते आहे. 
 विविध भागात पोलीसाना लक्ष ठेवणे अडचणीचे जाते, वाहणाची कमतरता त्या पोलीस संख्या ही कमी त्यामूळे पोलीसावर ताण पडतो आहे.  नाशिक शहरात अशाच कारणामुळे तेथील जिल्हा प्रशासनाने ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था केल्यामूळे नाशिक मध्ये काय घडते आहे.  हे तात्काळ जिल्हा प्रशासन व पोलीस कक्षात त्वरीत कळते, त्याच प्रमाणे तशी व्यवस्था लातूरात झाल्यास ड्रोन कॅमेर्‍याद्वारे लातूर जिल्हा प्रशासन व पोलीस नियंत्रण कक्षात सर्व घडामोडी उपलब्ध होतील आणि पोलीसावर पडणारा ताण कमी होईल, यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जाणीवपूर्वक लातूरसाठी ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या