रस्ते फस्त करणारे अभियंता स्वामी कोण

रस्ते फस्त करणारे अभियंता स्वामी कोण



लातूर ः (लातूर प्रभात प्र.) ः राज्यभरातील रस्ते वाहतूकीसाठी सुरळीत व सोयीस्कर व्हावीत यासाठी बांधकाम विभागा व्यतिरिक्त राष्ट्रीय रस्ते विकास कार्यालय निर्माण करुन याच विभागा मार्फत राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बांधणी व दुरुस्ती करण्याचे अधिकार विभागीय आणि जिल्हास्तरीय कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असल्याने राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था आहे, ते या मार्गवरुन प्रवास केलेल्यांच्या लक्षात येईल. 


राष्ट्रीय महामार्ग विभागीय कार्यालय लातूर येथे आहे.  या विभागात लातूर, नांदेडचा कांही भाग, बीड, उस्मानाबाद आणि परभणीचा कांही भाग येतो.  या राष्ट्रीय महामार्गाचे काम कार्यकारी अभियंता यांच्या अधिकारात होत असते.  कार्यकारी अभियंता म्हणून श्री श्री गौरीशंकर स्वामी हे असून गौंरीशंकराची उर्जा असलेले स्वामी महाराज हे बदली झाली तरी वरिष्ठाना चिरिमिरीचे अमिष दाखवून ते लातूर येथेच बदलीवर येत असतात.  अशी बांधकाम विभागात चर्चा होताना दिसते आहे.  
 रस्ते बांधणी, रस्ते दुरुस्तीची कामे ही, विशिष्ट अशा कंन्ट्रक्शन कंपणीलाच देण्यात येतात.  त्यात यश कंन्ट्रक्शन कंपणीची चर्चा होताना दिसते.  कंत्राट देण्यापासून ते मौजमाप पुस्तिका तयार करणे, देयके काढणे, असे व्यवहार बिनदिक्त होत असतात. अशी चर्चा असून बोगस कामे खरी दाखवून बिले उचलली जातात, अशी ही खमंग चर्चा कार्यालयीन परिसरात होताना दिसते.  श्री स्वामी यांची बदली झाली असताना गौरीशंकराची अर्थपूर्ण किमया दाखवून एका माजी मंत्र्याच्या कृपेने ते लातूरात पुन्हा आल्याची चर्चा होत असून केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली लूट करुन शासनाला फसविणार्‍या या स्वामी नावाच्या महाभागाकडे परभणी कृषि विद्यापिठाचा चार्ज कसा काय सोपविला गेला, अशी चर्चा असून अशा या बदली प्रतिनियुक्तीच्या कारभारात काय गौडबंगाल असावे अशी चर्चा असून मंत्रीस्तरीय पातळीवर गौरीशंकर स्वामी यांच्या आजवरच्या कार्यकाळाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्याच कार्यक्षेत्रातील इतर ठेकेदाराकडून होत असल्याची चर्चा कार्यालयीन वर्तूळात होत असताना दिसते आहे. रस्ते फस्त करणारे,  कार्यकारी अभियंता श्री स्वामी हे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची बांधणी दुरुस्ती कशी काय करतील अशी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या