माणूसकी गहीवरते तेंव्हा

संपादकीय..


माणूसकी गहीवरते तेंव्हा


 ज्यानां जगण्याची भ्रांत नाही, किंवा मरण्याची भिती नाही, घर ना दार किंवा नात्याचा ठावठिकाणा नसेल असेल ही, पंरतू मिळेल ते आणि कोणी देईल ते खावून जिथं रात्र झाली तिथंच कड धरुन रात्र काढायची आणि पुन्हा सकाळी तेच तेच करीत राहायाचे असा दिनचर्य करणारा भिकारी सकाळी सकाळी रस्तेच्या कडेवरुन पलिकडे जात असताना जनता संचार बंदी व लॉकडाउनच्या भितीने एकजन रस्ता ओलांढताना त्या ग्रस्ताची नजर त्या भिकार्‍यावर पडते.  त्याच्या बाजूला एक आंधळी व्यक्ती होती.  त्यामूळे त्या ग्रास्ताने ५० रुपयाची नोट धडशा व आंधळ्या व्यक्तीकडे देत असताना ते म्हणाले काल आमच्याकडे अन्न जिवडा व कांही सुटे पैसे जमा झाले.  मोठ्या दवाखाण्यात गेलो होतो म्हणून तर तूम्ही तिथं जा आणि तिथंल्या लोकांना द्या, ते शिळ खात होते.  तेच आम्हाला बी दिले होते.  तेच बरं होईल म्हणाले.  त्यावेळी तो ग्रस्त तात्काळ निघून गेला.  पण धडसा भिकारी होता तो थोडं फार शिकलेला आणि अपघाती उजव्या हाताने अपंग झालेला असावा म्हणून त्यास भिकेवर जगण्याशिवाय पर्याय नसेन.  पण त्यात माणूसकी दिसली.  हे मात्र विसरता येणार नाही असेच वाटते. 
 कोरोना रोगा मुळे रस्त्यावर बाजारात वर्दळ नसल्याने पाकीटमारांचे दिवस अंधकारमय झाले.  तर झोपडपट्टी ते बंगल्यातले लोक कोरोनाच्या भितीमूळे लॉकडाउन झाल्याने सर्वजन घरीच असल्याने चोरा संधी मिळत नसल्याने ते जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेला शिव्या देत असतील.  संसर्गजन्य कोरोना रोगावर राग काढत असतील. पण त्यांना मानवीमुल्य किंवा माणुसकीचे काय असा ही प्रश्‍न पडतो.  भिकारी आणि पाकीटमार चोरातील हा फरक माणूसकी गहीवरते तेंव्हाच कळू शकेल यात संदेह नसावा अशीच सर्वसामान्य जनतेच चर्चा होताना दिसते आहे. आणि हे वास्त नाकारुन माणूसकी बाजूला सारता येणार नाही, हे मात्र नक्कीच.
 संसर्गजन्य रोग मात्र भल्या भल्याची झोप उडवून सार्‍या जगाला बाधीत करुन तो सर्वसामान्यवर अधिराज्य गाजवितो आहे.  कोरोनाला उलथावून लावण्याची शक्ती आम जनतेकडे आरोग्य यंत्रणेकडे नाही, म्हणूनच तो दररोज आपला पसरा वाढवित असल्याने स्वतःसाठी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करणे गरजेचे आहे.  यापलिकडे आजतरी आपल्याकडे दुसरा कोणता उपाय नसावा म्हणून आम जनता स्वतःला कोंडवून घरात बसली यात आश्‍चर्य कसले एवढेच.
 आवश्यतेसाठी एखादी व्यक्ती बाहेर पडू शकते.  पण कांही अंशी हौशी लोक कांही तरी निमित्ताने रस्त्यावर किंवा गरजू वस्तू विक्रीच्या ठिकाणी गर्दी करीत असल्याने पोलीस प्रशासनाला त्रास सहन करावा लागत असल्याने गर्दी पंागवीण्यासाठी नावाविलाजाने प्रसाद ही द्यावा लागत असला तरी लॉकडाउनचे उलंघन केल्यास तात्काळ दंडात्मक कारवाईचे अधिकार असले तरी केवळ माणूसकी म्हणून पोलीस तशी कारवाई करु पाहत नाही.  याचा गैर फायदा नागरीकांनी घेवून नये असे वाटते. 
 मंत्रालयीन कर्मचारी, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, राज्य भरातील जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, लॉकडाउनचे नियम पाळित आहेत. मग आपण का पाळू नयेत अशी चर्चा होत असली तरी उच्चपद्स्थ आणि ऐपतदारा पेक्षा सर्वसामान्य जनता गोरगरीबांच्या समस्या वेगळ्या आहेत, कामगार रोजदारी काम कामकरणार्‍याना तर आज कोणी उसनवारी ही देत नाही, आणि कोणाकडे जावे तर संचार बंदी आडवी येते.  घरातील कांही भांडी कोंडी विकून गुजारा करावा म्हटले तर बाजार बंद अशा परिस्थितीत गरीब लोक कामगार अडकले असून शेजारील लोकच त्यांच्या लेकराबाळाकडे पाहून माणूसकीच्या भावनेतून मदत करीत आहेत, असावेत अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.  हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही, नसावे. 
 लातूरसह राज्यभरातील अनेक सेवाभावी संस्था, संघटना, पादत्र्याना रस्त्यावरील भिकारी, वाटसरु, रग्णालयातील रुग्णाचे नातेवाईक यांना अन्नाचे पॉकीट, पाण्याच्या बाटलीचे वाटप करीत आहेत.  तर कांही संस्था ज्या रुग्णास रक्ताची गरज आहे.  अशा रुग्णास मोफत रक्त मिळवून देवून माणूसकी जिवंत ठेवतील असताना दिसत आहेत.  अन्याय अत्याचार, खुन, दरोडे, तंटे, बखेडे, भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या देशात महाराष्ट्रात लातूरात ही माणूसकी जिवंत आहे, असे वाटते.  माणूसकी जेंव्हा गहीवरते तेंव्हा भिकारी सुद्दा माणूसकीच्या भावनेतून इतराकडे मदतीचे बोट दाखवितो त्यातच न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधू, भावाची जाणीव होते, यात संदेह नसावा.  एकंदरीत आजघडीला स्वार्थापेक्षा दुसरे कांही दिसत नाही.  पंरतू संसर्गजन्य कोरोना रोगामुळे पुन्हा एकदा किल्लारी भुकंपा प्रमाणे माणूसकीचा दिवा पाजळला, पाजळत आहे, यातच खरा सामाजीक न्याय एकता व माणवीमुल्याचे दर्शन घडते, हे सारे जेंव्हा माणूसकीला गहीवर येतो तेंव्हाच.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या