कोरोना हद्दपारीसाठी लॉकडाउनचे पालन करावे
मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः कोरोना रोग वरचेवर पसरत आहे. संशयीत रुग्णाची संख्या वाढते आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या महाराष्ट्रात १७७ असली तरी दररोज एक दोन रुग्ण घरी जात आहे. पंरतू नागरीकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सरकार, जिल्हा प्रशासने, पोलीस यंत्रणा अडचणीत येत असल्याने लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करावे असे अहवान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
लॉकडाउनमुळे ऊसतोड कामगारांची उपासमार होत असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करुन त्यांना त्यांच्या गावापर्यंत जाण्याची व्यवस्था करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काल मुंबई भेटीत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असून मुंबईत सॅनिटाझरचा काळाबाजार करणार्या विक्रेत्यास अटक करुन त्यांच्यावर मुंबई पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे. तर विषाणू कोरोना रोगाचे गांभिर्य लक्षात घेवून मुंबई विद्यापिठ अंतर्गतच्या सर्व परिक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येतील असे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रोगाने हाहाकार माजवीला आहे. राज्यातील त्या त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी स्थानीक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कोरोना रोग पसरु नये यासाठी दक्ष असले तरी जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून रोग नियंत्रणात आणण्यासाठी संचार बंदी लॉकडाउन काटोकोरपणे पाळले जावे यासाठी प्रयत्नशील असून राज्य सरकारने राज्यातील आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदार संघात कोरोना ग्रस्तासाठी व कोरोना पाबंदी करण्यासाठी शासन निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपय मंजूर केल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.