नागपुर शहरावर ड्रोन कॅमेर्याची नजर
नागपूर (लातूर प्रभात प्र.) ः भयभित करणार्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असून आजवर चार पाच कोरोना ग्रस्त बाधीत रुग्णाना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले असले तरी कोरोना रोगाचा वाढता प्रभाव होणारी लागन, जनता संचार बंदी, लॉकडाउनचे उलंघन अशा बाबीवर कटाक्ष ठेवण्यासाठी नागपूर शहरावर ड्रोन कॅमेर्याद्वारे नजर ठेवली जात असून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे बारीक लक्ष देवून असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर मध्ये सर्वच कंत्राटी कामे बंद असल्याने मजूराची उपासमार होताना दिसते आहे. कंत्राटदार निघून गेल्याने मजूर त्रस्त झाले असून जिल्हा प्रशासन अन्न धान्य पुरवठा करीत असताना ही हजारो मजूर पायपीट करुन आपापली गावे जवळ करीत असल्याची माहिती अधिकृत सुत्रानी दिली. नागपूर जिल्ह्यात कोरोना रोगाला प्रतिकार करण्याची कारवाई संथगतीने होत असल्याने कोरोना ग्रस्ताची संशयीत लागन झालेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील जनतेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीली असून आमदार यशोमती ठाकूर यांच्या अमरावती मतदार संघात अनेक लोकांनी मास्क म्हणून पळसाची पाणे तोंडाला बांधून बाजारहाट केल्याचे भिषन चित्र पाहून अमरावतीची हि दुरावस्ता आमदार यशोमती ठाकूर का बदलू शकत नाहीत, अशीच उलटसलूट चर्चा होताना दिसते आहे.