दिल्लीत संचारबंदीचे तीन तेरा

दिल्लीत संचारबंदीचे तीन तेरा


 


दिल्ली (लातूर प्रभात प्र.) ः  विषारी कोरोना रोगाचा नायनाट करण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होत आहेत.  लोकांनी स्वतःहोवून संचार बंदी स्विकारली.  तमाम भारतीयांना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी विनंतीवजा अहवान करुन कोरोना रोगाचा प्रतिकार करण्यासाठी जनता संचार बंदीशिवाय पर्याय नसल्याने जनतेचे सहकार्य अपेक्षीले त्यानुसार जनतेनेही सकारात्मकता दाखवीली. त्यामूळ कोरोना रुग्णाची भरती ओहाटी चालू असतानाच दिल्लीतील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते आहे.  
 दिल्लीत कामासाठी आलेले कामगार मजूर लोक हे उपासमारीला कंटाळून स्थलातंर करीत आहेत.  रस्तो रस्ती नागरीकांचे लोंढेच्या लोंढे दिसत असून लोकसंचार बंदिचे तिनतेरा झाल्याचे चित्र दिसत असून देशभरातील महामार्गावरील टोलधारकानी पायी प्रवास करणार्‍या प्रवाशाना अन्न पुरवठा करावा असे आदेश रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेले आहेत.  
 विशेष म्हणजे कोरोना रोगाची भिषण लागन त्याची व्याप्ती व त्यावरील उपाययोजना राबविण्यासाठी मदत व्हावी म्हणून दिल्ली विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचार्‍याना करोनाग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी एकमहिण्याचा पगार देण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षानी आदेश निर्गमनीत केले आहे.  मदतीचा ओघ वाढत असल्यामूळे निश्‍चितच विषारी कोरोना रोगाला लगाम बसेल यात शंका नसावी अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या