जिल्हाधिकारी यांच्या कोरोना हटाव मोहीमेला अवैद्य दारु विक्रीचा फटक

जिल्हाधिकारी यांच्या कोरोना हटाव मोहीमेला अवैद्य दारु विक्रीचा फटक


 


लातूर (लातूर प्रभात प्र.) ः विषारी कोरोना रोगाचा फैलाव होवू नये यासाठी जनता संचार बंदी लॉकडाउनचे कठोर पालन करावे यासाठी कडक निर्बध लादून आचार संहितेतून वृत्तपत्राना सुट असतानाही ही जिल्हाधिकारी यांनी वृत्तपत्र विक्रीला पाबंदी केली.  कारण वृत्तपत्राच्या दोन्हीकडील स्पर्शामुळे एकमेकांना जंतू संसर्ग होवू शकतो, हाताचा स्पर्श झाला तरी संसर्ग होण्याची भिती असते, प्रारंभीच्या काळात जनता संचार बंदीला विरोध होत असताना जिल्हाधिकारी यांनी शाळा, महाविद्यालय, शासकीय अधिकार्‍यांच्या बैठका, पत्रकार परिषद घेवून संचार बंदी कशी महत्वाची आहे, कोरोना रोग हा कसा विषारी आहे, त्याचा प्रतिकार कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करुन आम जनतेचा विश्‍वास संपादन केला. त्यामूळे संचार बंदी नंतर लॉकडाउनचे पालन जनता करीत असताना दिसते आहे. 
 जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकसमुहावर लक्ष केंद्रित करुन कोरोना रोगाची इतरांना लागन होवू नये यासाठी तत्परतेने कारवाई करुन ते स्वतः शहरी व ग्रामीण भागासह जिल्ह्यातील बदलावर लक्ष केंद्रित करुन आहेत.  पंरतू जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कोरोना हटाव मोहीमेला अवैद्य दारु विक्रेते आणि मद्यपी लोक अडथळा आणीत असून अनेक ठिकाणी अवैद्य देशी दारु विक्री होत असून जमावाने लोक तिथे ये जा करीत असल्यामूळे कोरोना रोगाच्या प्रतिकात्मक लढाईसाठी पोलीस गुंतले असतानाची संधी घेवूनच अवैद्य दारु विक्रेते गैर फायदा घेत असतानची चर्चा होताना दिसते आहे.  त्यामूळे जिल्हाधिकारी यांच्या कोरोना हटाव मोहिमेला अवैद्य दारु विक्रीचा फटका बसतो की काय अशी कुशंका व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या