संपादकीय...
भिरभिरत्या पाखरानं देश पोखरला
चीन मधील कुहान मधून भिरभिरत्या पाखरानं कोरोना रोग घेवून सार्या जगाला हादरा दिला. तर भारताला पोखरुन टाकलं, भिरभिरत्या विमानात कांही प्रवाशी येतात काय, सर्दी, खोकला, तापीने दवाखान्यात दाखल होतात काय आणि रोग कोणता हे कळण्यापुर्वीच चीन मधून कोरोना करोना कोवीड १९ अशा नावाच्या रोगाने सारा भारत जर्जर होतो, तसेच सारे जग ही हादरते, पोखरुन जाते पण अमेरिकासारखा देश ही हातबल होतो. आणि संशोधन प्रक्रिया सुरु होते. त्यातच सारे जग मास्कच्या आडून जगण्याच्यासाठीच्या तमाशात सहभागी होवून भिरभिरत्या पाखराचं कोरोना रोगाचे पंख छाटण्यासाठी आरोग्य विभागासह केंद्र व राज्य शासने तत्पर होतात. यात नवल नसावे ही बाब नैसर्गीक आपत्ती म्हणूनच जनता सावध झाली. हे वास्तव नाकारता येत नाही.
देशातील आम जनता भेदरली, घाबरली, रोगाचे निदान नाही, पण रुग्णाची संख्या वाढतच होती. अशावेळी संसर्गजन्य अशा कोरोना रोगाचा पसारा वाढू नये यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता संचार बंदी लागू केली. टिका टिप्पनी झाली पण रोगाचे गंभीर स्वरुप लक्षात येताच जनता ही स्वतःला कोंडवून घेवून शासकीय यंत्रणेला सहकार्य करु लागली. मात्र सर्वसामान्य जनतेचे हाल आजही कायम आहेत, हे निर्विवाद सत्य असले तरी दुसरा कोणता विकल्प नसल्याने जनता विमुख होवून भिरभिरत्या पाखरानं, चीनी विमानान कोणत्या रोगाची पेरणी भारतीय नागरीकांच्या माध्यमातून केली हे कोडे मात्र आजही उलगडलेले नाही. त्यामूळे कोरोना तर करोना म्हणून महाराष्ट्रसह देशभरातील वैद्यकीय अधिकारी जिवापाड कसोशीने प्रत्यन करीत असून कोरोनाचा पाडाव कसा करता येईल यासाठी धडपडत असताना दिसतात.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथील डॉक्टरासह लातूर येथील वैद्यकीय अधिकार्याना उपचारात यश आले असून उत्तर प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ मधील परिस्थिती अटोक्यात असल्याने निश्चितपणे कोरोना मुक्त भारत होईल या बद्दल आशा बळावल्या बाबतची चर्चा होताना दिसते आहे. प्रारंभीच्याकाळात शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणे बाबत नागरीकातून संताप व्यक्त होताना दिसत होता. पंरतू दुरचित्रवानीवरुन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ कोरोना रोगा विषयी आणि तो कसा फैलावतो, त्याचे दुष्परीनाम कसे तात्काळ होतात, याची माहिती देत होते, देत आहेत, त्यावरुन जनतेने टिका टिप्पणी थांबवीली असली तरी प्रशासन आणि पोलीस यंत्रणे अतिरेक करु नये अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे.
चीन मधील प्रशासन व आरोग्य विभागाला कोरोना रोगाची जाणीव झाली होती. चीनने परदेशी नागरीकांना तेथेच उपचार करणे गरजेचे असताना द्वेषमुलक हेतूने जाणीवपूर्वकच त्या त्या देशातील नागरीकांना, विद्यार्थ्याना त्यांच्या त्यांच्या देशात पाठविले आणि भारतासह अनेक देशात भिरभिरत्या चीने पाखरानं जगाला हादरा दिला तर भारताला पोखरले अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. तरी ही चीनवर टिका टिप्पणी न करता आपापल्या देशातील, राज्यातील प्रशासन आरोग्य विभाग कोरोना विरोधात लढा देताना दिसत आहेत. त्यात नागरीकांचा सभाग अधिकाचा जाणवतो हे नाकारता येत नाही असेच म्हणावे लागेल.
विशेषतः जगातील प्रत्येक देशाना जागतीक बंधूभाव राष्ट्रीय एकात्मता मानवीमुल्य आधारभुत माणूनच एकमेकाशी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे पण चीन पाकिस्तान पुर्वीपासूनच भारता सोबत आकसाने वागतात. त्याच कोरोना रोगाचा प्रार्दुभाव पसरला. चीन व पाकिस्तानेही तेथील नागरीकाना भारतात पाठवून दिल्याने त्यांच्या द्वेष भावनेची कल्पना आली असली तरी भारताने संशय राखून भारतीय नागरीकांनाच संशयमाने कोरोनाचा मुकाबला करण्याचे अहवान केले. आणि त भारतीय नागरीकाने स्विकारले. पंरतू भिरभिरत्या चीनी पाखरांची पंखे उखडून टाकल्याशिवाय या पुढे दुसरा कोणता विकल्प असू नये अशीच जागृत लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
आजवर शहरी, राजस्तरीय, देश पातळीवरील वृत्तपत्रानी संशमानीच कोणी कोणावर भडकू नये किंवा भडकवू देवू नये अशी भावना ठेवूनच पत्रकारीता केलेली आहे. हे नाकारुन चालत नाही. कोरोना रोग हा नैसर्गीक असला तरी देशावरील आपत्ती संकट आहे, हेच समजून प्रशासन, पोलीस यंत्रणा नागरीक हे सहमतीने कोरोना रोगा विरोधात लढा देत आहे. हे नसे थोडकेच वाटते.
तरी पण केंद्र व राज्य शासनाने कोरोना रोगाचे दुष्परीनाम गांभीर्य लक्षात घेवून सावधगीरीने तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे वाटते. आरोग्य विभागाने ही कटाक्षाने लक्ष केंद्रीत करुन रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. रोगाचे निवारण होते आहे, रुग्ण घरी जात आहेत, कोरोना ग्रस्त लागण झालेले रुग्ण दाखल रुग्णापैकी एक टक्का ही नाहीत म्हणून गाफील राहता कामा नये, अशीच चर्चा जाणकार लोकातून होताना दिसते आहे. यासाठी पत्रकारानी जनजागृतीसह प्रशासन आरोग्य विभागालाही प्रचार प्रसारातून सहकार्य करणे वास्तव वाटते.
अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. भिरभिरत्या पाखरानं देश पोखरला तरी त्यांचे पंख छाटने हेच अगत्याचे वाटते.