लातूर जिल्ह्याला संशयीत कोरोनाचा विळखा, लोकप्रतिनिधी गायब

लातूर जिल्ह्याला संशयीत कोरोनाचा विळखा, लोकप्रतिनिधी गायब



लातूर (लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहर व जिल्हाभरात विषारी कोरोना रोगाने थयथयाट माजवीला असून लोक जिवमुठीत घेवून लॉकडाउनमूळे घरात अडकून पडलेले आहेत.  अशा परिस्थितीत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघात नसल्यामूळे मतदार संघातील जनता हवालदिल झाल्याचे चित्र दिसते आहे.  कोरोना रोगाच्या प्रतिकारासाठी योग्य ते मार्गदर्शन, जनतेला धीर देणे, आणि रोगाचे निर्मूलन करण्यासाठी उपाय योजना करणे, लॉकडाउन मध्ये असलेल्या जनतेची सेवा पुरविणे अशी कामे लोकप्रतिनिधीची असतात.  लोकप्रतिनिधीच आपापल्या मतदार संघातील जनतेचे पालक असतात, पण पालकच गायब असल्यामुळे शासकीय पालकत्व स्विकारलेले जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन हेच लातूर शहर व जिल्हाभरातील संशयीत कोरोना रुग्णावर आणि आम जनतेवर सावधगीरी म्हणून लक्ष केंद्रित करुन कार्यरत असल्याचे चित्र दिसते आहे.  पंरतू लोकप्रतिनिधीच नसल्यामूळे वैद्यकीय उपचारात ढिल पडले की काय अशीच शंकात्मक चर्चा होताना दिसते आहे.  


लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघातील सहा आमदार, आणि एक खासदार आहे, हे सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघात ठाण मांडून न बसता मुंबई दिल्लीत बसून लातूरकर जनतेला मतलबी धीर देताना दिसतात.  कोणी लोक प्रतिनिधी तर कोणाएका हस्तकाला धरुन बातम्या पेरीत असल्याची चर्चा होताना दिसते आहे.  पंरतू लॉकडाउन मुळे गोरगरीब, कामगार मजूरांचे काय हाल होत असतील याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष कसे अशी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  ही बाब आम जनतेवर अन्याय करणारीच असावी अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 आम जनतेसह सामाजीक कार्यकर्त्याना, राजकीय कार्यकर्त्याना जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या सुचना देते, तर पोलीस प्रशासन भलत्याच सुचना देवून दंडात्मक कारवाई करते.  सामाजीक राजकीय कार्यकर्ते, पत्रकाराना मज्जाव करुन त्यांना लॉकडाउनच्या निमित्ताने गुन्हा दाखल करुन त्यांची मुस्कटदाबी केली जाते.  मग प्रशासन, पोलीस यंत्रणा काय करते आहे, हे आम जनतेला कसे कळणार.  असा प्रश्‍न समाज माध्यमासह प्रसार माध्यमातून विचारला जातो आहे.  त्याचे निराकारण करणे किंवा विचारणे दुरापास्तच होते.  आणि लॉकडाउनचा बडगा सहन करावा लागतो.  अशी विचित्र अवस्था लातूर शहर व जिल्हाभरातील सामाजीक राजकीय कार्यकर्त्यासह पत्रकाराची झालेली दिसते. 
 कोरोना रुग्णाचा फैलाव होत असला तरी खाजगी दवाखाने बंद असल्यामुळे शासकीय रुग्णालयात संशयीत रुग्णाची गर्दी आहे, इतर रुग्ण ही उपचारासाठी जात असतात.  कोणावर कसे उपचार होत आहेत, संशयीत कोरोना रुग्ण किती आहेत, त्याचा चाखाचोळा घेण्यासाठी पत्रकाराना मज्जाव असल्यामूळे जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा बोले, संशयीत रुग्ण त्यावरच चाले, अशीच अवस्था कोरोना रुग्णाची झाली असून खरे काय खोटे काय हे त्या त्या रुग्णाना आणि जिल्हा प्रशासनालाच माहित असावे यात संदेह नसावा अशी चर्चा होताना दिसते आहे. लातूर शहर व जिल्हाभरातील संशयीत कोरोना रुग्णासह गोर गरीब, कामगार, मजूरांचे बेहाल होत आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्यासाठी त्यांच्या समस्याची पूर्तता करण्यासाठी आणि शासकीय सुविधानुसार संशयीत कोरोना रुग्णावर उपचारा संबधी जाब विचारणारे लोकप्रतिनिधीच गायब असल्यामुळे लातूर जिल्ह्याला संशयीत कोरोना रोगाचा विळखा घट्टच होणार यात शंका नाही, परंतू बेजबाबदार लोकप्रतिनिधीच नसल्यामूळे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेची चलती असल्यामूळे इतरांना बोलण्यासाठी वाव नसल्यामूळे आम जनता तोंड दाबून बुक्याचा मार सहन करते की काय अशीच अवस्था निर्माण झाल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेतून होताना दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या