जिल्हाधिकारी जी श्रीकांत लाईव्ह कार्यक्रमातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे
लातूर (जि.मा.का) ः जिल्ह्यात Active पॉझिटिव्ह केसेस ४१
* होम क्वारंटाईन असणार्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येणार आहे. तरी होम क्वारंटाईन असणार्या नागरिकांनी बाहेर न पडता आपल्याला लागणार्या अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येणार आहे.
* कंटेनमेंट झोन मधील प्रत्येक ठिकाणी Whatsapp ग्रुपची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी हे स्वत:हा सर्व ग्रुप मध्ये असणार आहेत.त्यामुळे कंटेंनमेंट झोन मधील नागरिकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही.
डॉ.विश्वास कुलकर्णी: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर जिल्हा अध्यक्ष
* लातूर जिल्हयातील सर्व डॉक्टर्स हे आपली सेवा व्यवस्थित रित्या बजावत आहेत, त्यामध्ये शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करुन सुरक्षितरित्या पाळण्याकरीता लागणारे सर्व साहित्य हॉस्पीटल मध्ये वापरण्यात येत आहेत.डॉक्टर स्वत:हा काळजी घेऊन रुग्णांची देखभाल ,शस्त्रक्रिया करीत आहेत.
* बाहेरुन आलेल्या लोकांमध्ये जर लक्षणे दिसली तरच अशा लोकांची तपासणी करण्यात येत आहे. व येणार्या सर्व व्यक्तिंची तपासणी ही या ठिकाणी करुन त्यांना होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात येतो व त्यांना घरीच राहण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.
* लातूर मध्ये जे वयस्कर डॉक्टर्स आहेत अशांची काळजी घेणे व शासनाच्या नियमानुसार ते व्यक्ति ज्यांचे वय जास्त आहे असे दवाखानेच फक्त बंद आहेत, बाकीचे सर्व सुरु आहेत.
* आरोग्य सेवेत कार्य करणार्या लोकांच्या विरोधात मत व्यकत करु नये व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या पध्दतीने भेदभाव करु नये, कारण ते आपलेच आहेत. त्यांना बहिष्कृत करण्याचा प्रयत्न करु नये असे केल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे, म्हणून सर्वांना विनंती आहे की डॉक्टर्स व आरोग्य विभागात काम करण्याचा सन्मान करावा व त्यांचा आदर करावा.
* वैद्यकीय प्रमाणपत्र सध्या सर्व खाजगी MBBS डॉक्टर्स मार्फत मोफत देण्यात येत आहेत, जे व्यक्ति स्वत:हा उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणे करुन जेणे करुन त्यांची तपासणी करुन योग्य ते उपचार सुचवता येतील.
* ईद ही घरी राहूनच साजरी करण्यात यावी अशी प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.इतर कोणत्याही ,बाहेरच्या ठिकाणी एकत्रित येवून नमाज अदा न करता आपआपल्या घरीच नमाजचे पठण करावे असे प्रशासनाच वतीने आवाहन करण्यात येत आहे.
* ४.० लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी अतिशय जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे. आपली इम्युनिटी वाढविण्याकरीता पौष्टीक आहाराचे सेवन करावे, गरम पाणी प्यावे, शक्यता थंड पाणी पिवू नये.
जिल्हाधिकारी जी श्रीकांत दि. २३ मे २०२० लाईव्ह
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...
-
लातूर, (जिमाका) : महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...