साठेबाजीला बळकटी मिळण्याचा धोका

साठेबाजीला बळकटी मिळण्याचा धोका 


      सातारा (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड संसर्गामुळे उद्योग व्यापार बंद पडल्याने महसूल बुडाला, आर्थिक परिस्थित नाजूक बनली, तीच आर्थिक बळकटी यावी यासाठी केंद्र सरकारने उद्योग व्यवसाय व्यापाराला उभारी मिळावी यासाठी कोट्यावधी रुपयाचे पॅकेज जाहिर करुन तसे वर्गीकरण केले.  अशा कृती मुळे देशाची आर्थिक परिस्थिती बळकट न होता, साठेबाजीला अधिकच बळकटी मिळण्याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा सांकेकी क्षेत्रात होताना दिसते आहे. 
 कोरोना कोविडची लागण व यात कोविड विषाणूच्या निर्मूलनासाठी टाळेबंदी लागू केल्याने राज्यासह देशाची आर्थीक स्थिती डळमळीत नाजूक बनली, त्यात शेती व्यवसायात नापिकी झाली.  टाळेबंदीमूळे कामगार मजूराचे बेहाल सुरु झाले.  म्हणून शेती व्यवसायाला बळकटी देणे, कामगार मजूरांना आर्थिक स्त्रोतातून उभे करणे, छोट्या छोट्या व्यवसायीकानां अर्थसहाय्य देणे, या बाबीकडे दुर्लक्ष करुन धनदांडग्या उद्योगपती व्यापार्‍याना पॅकेज देणे म्हणजे व्यापारी क्षेत्र सक्षम बनविण्याऐवजी साठेबाजाना संरक्षण व अर्थसहाय्य देवून त्यांनाच बळकटी देण्याने देशाचे अर्थव्यवस्थेलाच धोका निर्माण होतो की काय, अशीच चर्चा आत्मनिर्भयतेतून साठेबाजीकडे भारताची वाटचाल असावी यातूनच असे व्यक्त होताना दिसते आहे.  म्हणूनच केंद्र सरकारची भुमिका ही, साठेबाजीला बळकटी देणारीच असावी यातूनच सर्वसामान्याच्या विकासाला धोका उत्पन्न होतो अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या