टाळेबंदीमूळे अर्थव्यवस्था नष्ट झाली, कोविड नव्हे !

टाळेबंदीमूळे अर्थव्यवस्था नष्ट झाली, कोविड नव्हे !



      दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र) ः कोरोना कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली पण यातून कोविडची लागण संपूष्टात आली नाही पण देशाची अर्थव्यवस्था मात्र पूर्णपणे ढासळली-नष्ट झाली आणी केंद्र सरकार अयशस्वी ठरले असे स्पष्ट मत उद्योजक राजीव बजाज यानी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांचेशी दुरचित्र संवादात बोलताना व्यक्त केले. 
 कोरोना कोविड रोखण्यासाठी इतर कोणत्याही देशाने भारतासारखी टाळेबंदी लागू न करता कोविडचा मुकाबला कला, करीत आहेत.  पंरतू भारताने कसलाही विचार न करता टाळेबंदी लागू करुन उद्योग बंद पाडले, कामगार रस्त्यावर आले आणी देशाची आर्थीक घडी विसकटले असे स्पष्ट करुन टाळेबंदी वाढविली, फिजीकल अंतर ठेवले पण कोरोना कोविडचे निर्मूलन झाले नाही.  उलट वाढतेच आहे हा धोका लक्षात घेवून केंद्र सरकारने आजघडीला सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष आर्थीक न्याय दिला पाहिजे असेही राजीव बजाज यानी म्हटले. 
       विरोधकाच्या टीकेला किंवा प्रसारमाध्यमाना कोंडवून देशाचा विकास होणार नाही, त्यासाठी सहिष्णूता व संवेदनशिलता आणी विकासाची दृष्टी महत्वाची असते त्यासाठी केंद्र सरकारणे कार्यरत राहावे आम्ही पाठीशी राहू असे आवाहनही राजीव बजाज यानी केले. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या