संपादकीय...
भारत हा भारतच राहाणार
- भारत हा भारत आहे. आणी पुढील काळातही पृथ्वी असेपर्यत ही भारतच राहाणार आहे. त्यामूळे कोणी भारताचे नांव बदलायाचा किंवा बदलणार काय अशी खूळपट-बिनडोक कल्पनाही मनात आणू नये अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. कालपरवा कोणा माथेफिरुने भारत की इंडिया किंवा हिंदूस्थान असा नवा वाद काढून जनतेला हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या महाभागाची म्हणणे असे की, भारत हा इंडिया म्हणून संबोधिला जातो आहे. भारतीय राज्य घटनेच्या पहिल्या मसूद्यात इंडिया हा उल्लेख आहे मग भारताचे नांव इंडिया कि हिंदूस्थान असे नामांतर करावे अशी याचिका न्यायालयात दाखल केली तीवर मत नोंदविताना न्यायालयाने देशाचे किंवा कोणतेही नांव न्यायालय बदलू शकत नाही तो सरकारचा अधिकार आहे असे स्पष्ट करुन केंद्र सरकारच्या कोर्टात तो प्रश्न ढवकलून विषय टाळला आहे.
इसवी सन सालापासून या देशाचे नांव भारत आहे. त्यामुळे इंडिया की भारत किंवा हिंदूस्थान हा वाद उकरण्याचे कारण नसावे. भारतावर इंग्रजाचे राज्य आले त्यावेळी त्यानी भारताचे भाषांतर करुन त्यांच्या सोईनुसार इंडिया हा शब्द वापरला तो आजवर वापरात आहे. एवढेच नसून देशाचा कारभारच इंग्रजी भाषेतून चालतो आहे मग कोणा शहाण्याने केवळ इंडिया म्हटले तर इंग्रज राजवट वाटते म्हणून भारताचे नांव इंडिया की हिंदूस्थान आहे की तसे ठेवावे व नामांतर करावे हा अतिरेक विचार करणे चूकीचे वाटते.
पूर्वी भारतात हिंदू संस्कृती कार्यरत होती. पर्यायाने हिंदू लोक होते असा अर्थ प्रभावित होतो ही रचनाकृती मनूची होती,आहे. मनुसंस्कृतीतूनच हिंदूत्व रुजले पण आजघडीला हिंदूत्व हा संकल्पनाच असून नसल्यागत असताना कोणी तरी वाद व्हावा म्हणूनच असे खूळपट काढणे चूकीचे वाटते. भारत हा बुध्दकालीन देश आहे. हा इतिहास सांगतो. पण आजघडीला इतिहासकार अशा बाबीकडे लक्ष न देता केवळ पोटभर संशोधन करुन इतिहासकार, संशोधक मिरविताना दिसतात. कोठे पाल चूकचुकली की सारे विचारवंत इतिहासकार एकत्र येवून आपापलेमत व्यक्त करीत असतात. पण आठदिवसापूर्वीच न्यायालयाने भारत या नावाबद्दल केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले अंग काढून घेतले यावर कोणीही टिप्पणी करीत नाही याचे आश्चर्य वाटते. कारण आजघडीला कोरोना कोविड रोगाचे निर्मूलन, कामगार, मजुराचे प्रश्न, भारताची घसरलेली अर्थव्यवस्था, देशाचा विकास, शैक्षणीक धोरण, शेतकर्याचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचारामूळे केंद्र शासनावर चोहीकडून टीका होत आहे. अशा या नाजूक विषयावरुन लक्ष विचलीत व्हावे यासाठीही असले खूळ काढले असावे अशी ही चर्चा होताना दिसते आहे.
आजघडीला केंद्रात भाजपाचे सरकार असून बहुमतात आहे. कोणताही विषयावर विरोध झाला तरी वटहुकूम काढून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे आपला गाडा पुढे ढकलीत असतात. असा आजवरचा अनुभव आहे तरीही राष्ट्रीय स्वंय सेवक संघाच्या आदेशावरुन चालणारे केंद्र सरकार असले आणी त्यांची मूळ संकल्पना हिंदूत्वाची असली तरी भारत हा धर्मनिरपेक्ष, समानतावादी लोकशाहीवादी देश असल्याने हिंदूत्वाचे किंवा हिंदूस्थान म्हणून वावरणार्याचे इंथ कांही चालत नाही. राष्ट्रीय स्वंय सेवक संघ, विश्वहिंदू परिषद, हिंदू महासभा, शिवसेना हे सगळेच भारताला हिंदूस्थान म्हणतात पंरतू संविधानकृत आणी मानवी संस्कृतीकृत भारत हाच शब्द असून हा देश भारत याच नावाने ओळखला जातो. ज्याना मराठी जमत नाही ते इंडिया म्हणतात त्यात काय बिघडले अशीही चर्चा होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे हिंदूग्रंथ रामायन, महाभारतातही भारत हाच शब्द अधोरेखीत आहे. इंडिया किंवा हिंदूस्थान नाही हे याचिकाकर्त्यानी लक्षात घ्यावे व हिंदू म्हणून घेणार्यानी लक्षात ठेवावे अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. कोणीही यावे आणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या आधार घेवून कांहीतरी अवघड प्रश्न चर्चेत आणावेत ही बाब आजघडीला परवडणारी नाही. देशाच्या विकासासाठी अनेक प्रश्न आहेत. अनेक समस्या आहेत त्या सोडवून देश कसा विकसीत-बलवान होईल याकडे सर्वानीच लक्ष केंद्रीत करुन देशासाठी योगदान द्यावे अशीच न्यायीक अपेक्षा आमजनतेतून होत असताना असे कूटील कारस्थान करुन काय साध्य होणार आहे याचाही विचार व्हावा अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. देशभरात मराठी भाषा ही मातृभाषा म्हणून स्विकारावी अभिभाषाचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होत आहे. तसा शासनाने ठराव पास केला आहे. त्यामूळे इंडिया हा शब्द आपोआपच नाहीसा होणार आहे. भारत हा भारतच राहाणार आहे यात शंका नाही. भारत या नावासाठी न्यायकक्षाची गरज नसावी लोकमान्यताच खरी आहे यात संदेह नाही. जय भारत !