न्यायालयाने दिली तीन दिवसांची पोलीस कोठडी

माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांना भोकर न्यायालयाने दिली तीन दिवसांची पोलीस कोठडी



 भोकर / सिद्धार्थ जाधव /भोकर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी घनकचरा उचलणार्‍या गुत्तेदारास जातीवाचक शिवीगाळ आणि खंडणी पोटी धमकावून रक्कम मागितली व न.प.कर्मचारी यास जातीवाचक शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा निर्माण केली या प्रकरणी भोकर पोलिसात माजी नगरसेवका विरुद्ध खंडणी व ऍट्रोसिटी कायद्या अतर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि ५ जून रोजी रात्री भोकर पोलिसांनी अटक करून आज ६ जून रोजी भोकर जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता आरोपी व सरकारी वकिलांच्या युक्तिवादा दरम्यान माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी मा. न्यायालयापुढे फिर्यादी च्या माणसांकडून दिलेल्या त्रासा बद्दल व्यथा मांडली. यावेळी सर्व ऐकून केशव मुद्देवाड यांना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.


केशव मुद्देवाड यांनी मा. न्यायालयापुढे मांडली व्यथा
केशव मुद्देवाड यांना मा.न्यायालयात हजर केले असता ते म्हणाले की मी लोकनियुक्त नगरसेवक असून मला रस्त्यांनी न्यायालयात पायी आनत  असताना माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणार्‍या फिर्यादी  च्या हस्तकांनी माझ्या समोर येवून त्रास व धमक्या दिल्या असून सदरील लोकांकडून माझ्या जिवीत्वास धोका आहे.तरी मा. न्यायालयाने  मला न्याय द्यावा.


केशव मुद्देवाड यांच्यावर धमकी दिल्याचा तिसरा गुन्हा दाखल 
केशव मूद्देवाड यांना मा. न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात नेत असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वारा जवळ  माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर आले असता पोलीस बंदोबस्तातील आरोपी केशव मुद्देवाड यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांनी भोकर पोलासात दिलेल्यावरून केशव मुद्देवाड यांच्या विरुद्ध भोकर पोलिसात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
   भोकर नगरपरिषद अंतर्गत शहरातील घन कचरा उचलणारे गुत्तेदार यशवंत ग्यानोबा प्रधान यांनी माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी खंडणी मागल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे तर भोकर नागरपरिषेदेचे कार्यालयिन कर्मचारी साहेबराव मोरे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुकी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला सदरील दोन्ही गुन्हे प्रकरणी केशव मुद्देवाड यांना भोकर पोलिसांनी दि.५ जून रोजी अटक केली आणि आज दि.६ जून रोजी भोकर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले यावेळी सरकारी वकील व आरोपींचे वकिल यांच्यात युक्तिवाद झाला या दरम्यान केशव मुद्देवाड यांनी मा. न्यायालयापुढे फिर्यादीच्या हस्तकाकडून दिलेल्या त्रासा विषयी व्यथा मांडली वकील व आरोपी या सर्वांच्या बाजू ऐकून जिल्हान्यायधीश मुजीब एस. शेख यांनी केशव मुद्देवाड यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या