शिऊर पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथकाची जोरदार कारवाई, शिऊर पोलीसांचे पितंळ उघडे पाडल
वैजापूर/प्रतिनिधी (ज्ञानेश्वर मगर) कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. काहींना खायला अन्न मिळेना. काही तर पाण्यावाचून तडफडत आहेत. मात्र, शिऊर गावात व बंगला येथे, व्यसनी लोकांचे चोचले पुरवले जात आहेत. बंदी असूनही गुटखा विक्री जोमाने होत आहे. तालुक्यात शिऊर बंगला येथे अवैध गुटखा विक्रीला ऊत आला असून एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचा काम सुरू केलं आहे.महाराष्ट्र सरकार ने गुटखा विक्री वर बंदी आणली मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं जिल्हाभर दिसून आले आहे तसेच हा गुटखा व्यवसाय नाशिक जिल्ह्यातील येवला येथुन जोरात सुरू आहे .पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात परिसरातून नागरिकांमध्ये चर्चा सुरु होत आहे.
वैजापुर तालुक्याच्या शिऊर गाव , शिऊर बंगला, लोणी. जानेफळ. खरज. आणी, परिसर मध्ये होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे भरदिवसा पांढर्या कलरच्या ओमीनो गाडीमधे गोण्या टाकून बिनधास्तपणे लागेल त्याला माल पुरवला जातो.संबधीत खात्याच्या भ्रष्ट अधिकार्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने कारवाई होण्याची चिंता नसून कुठल्याही प्रकारची भिती सुद्या नाही यात शंकाच नाही त्यामुळे गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे. छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही येणार्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत कानाडोळा केल्याचे दिसून येते व बघ्याची भूमिका घेतली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही जिल्हात अन्य भागांप्रमाणेच वैजापुर तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. तालुक्यातील शिवूर पोलीस ठाण्याच्या हद्यीतून अवैधरित्या गुटखाची वाहतूक करणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा , औरंगाबाद ग्रामीण येथील अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे वैजापुर हद्यीतील घरफोडीचे गुन्हयाचे तपासात असतांना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की , येवला येथुन एका पांढर्या रंगाच्या ओमनी कार मध्ये काही इसम स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला हिरा गुटखा व सुगंधीत तबांखु भरुन ते भारंब , जरुळ , वैजापुर मार्गे गंगापुर येथे घेऊन येणार आहे , अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह बिलोणी गावांजवळ सापळा रचला असता सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना येवल्याकडुन एक पांढर्या रंगाची ओमनी कार येतांना दिसल्याने त्यांनी तिला हाथ दाखवुन थांबवुन कार थाबविली व कारमधील इसमांकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नांवे ( १ ) मोहमंद सलीम शफीक अन्सारी वय ३१ वर्ष रा . येवला जि . नाशीक ( २ ) मोहसीन बकर अन्सारी वय ३० वर्ष रा . गंगापुर जि . औरंगाबाद असे सांगितले , त्यांचे ताब्यातील ओमनी कारची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला हिरा पान मसाला व सुगंधीत तम्बाखु असा माल मिळून आल्याने नमुद इसमांचे ताब्यातून ओमनी कार व गुटखा असा एकुण ३,७६,००० / - रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यांत आला असुन नमुद इसमांना पुढील कायदेशीर कायवाहीसाठी मुद्येमालासह पोलीस ठाणे शिऊर यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत कुंदे , पोलीस उप निरीक्षक संदीप सोळंके , पोह / श्रीमंत भालेराव , पोना / किरण गोरे , वाल्मीक निकम , पोकॉ / संजय तांदळे यांनी केली आहे.