लातूर जिल्ह्यात कोरोनाचा निपटारा, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा
लातूर (दै.लातूर प्रभात प्र) ः उदगीर तालूक्यातील धोंडीहिप्परगा येथील किसन बिरादार, सुधाकर बिरादार, पदमाकर बिरादार व रेखा कनगुले यांनी संगनमत करुन सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमन करुन बांधकाम केले तशी तक्रार आल्याने तहसीलदार उदगीर यांच्या आदेशान्वये तलाठी धनाजी भोसले हे अतिक्रमीत जागेचा पंचनामा करणेसाठी गेले असता अतिक्रमनधारकानी जाणीवपूर्वक शिवीगाळ करुन मारहान केली व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुन अनंतपाळ तालूक्यातील साकोळ येथील रहिवाशी महेश तिवारी हे घुगीसांगवी येथे जनावरासाठी औषध आणणेसाठी गेले असता तेथील रहिवाशी सुधाकर हनुमंत बिरादार व इतरानी तिवारी याना मारहान करुन जखमी केले तिवारी यांच्या तक्रारिवरुन आरोपीवर गून्हा दाखल झाला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच रेणापूर तालूक्यातील खरोळा येथील रहिवाशी विजयकुमार झपरे यानी संभाजी चौकातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. तशी नोंद रेणापूर पोलीस ठाण्यात केली असून आत्महत्तेची कारण समजू शकले नाही.
लातूर जिल्ह्यात कोरोना कोविडचा युध्दपातळीवर निपटारा केला जातोय पंरतू कायदा व सुव्यवस्था ढासळत असून मारामारी, वाटमारी, अवैद्य दारु विक्री, जूगाराचा सूळसूळाट झाला असून लातूर जिल्ह्यात कोरोनाचा निपटारा पण कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा अशीच अवस्था झाल्याचे चित्र दिसते आहे.