क्रांती नगर लातूर २ आणि बाभळगाव १ व्यक्तीचे पॉझिटिव्ह अहवाल ...
लातूर (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तापसणीसाठी महानगरपालिकेकडून आलेले दिनांक 11.06.2020 रोजीचे तीन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती क्रांती नगर लातूर येथील आहेत.
दिनांक 12.06.2020 रोजी या संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती बाभळगाव येथील असून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे