नाभिक समाजास आर्थीक मदतीचे पॅकेज तात्काळ जाहिर करावे
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयातील नाभिक समाजाच्या वतिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदन देऊन आर्थीक मदतीचे पॅकेज तात्काळ जाहिर करावे अशी मागणी करण्यात आली. कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आपण आदेश काढुन सलुन दुकाने दि. २२ मार्च पासुन बंद ठेवण्यास सांगीतले या काळामध्ये सलुन व्यवसायीकांनी आपला आदेश पाळुन आपले व्यवसाय पुर्णत : बदं ठेवले पणं यामुळे सलुन व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही आजपर्यंत अनेक वेळा निवेदन देऊनही शासन त्याची दखल होत नाही. महाराष्ट्र मध्ये अनेक व्यवसायांना परवानगी दिलेली आहे परंतू सलुन व्यवसायास परवानगी दिलेली नाही, तामिळनाडु दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यात नाभिक समाजाला महिना ( १०,०००) दहा हजार रुपये प्रमाणे आर्थीक मदत देऊन सलुन व्यवसायास अटीवर परवानगी दिलेली आहे. तरी महाराष्ट्र शासनानेही नाभिक समाजास आर्थीक पॅकेज देऊन सलुन व्यवसाय परवानगी द्यावी अन्यथा लोकशाहीच्या मानवी मुल्याच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भुमिका घेऊ.
या आंदोलनामुळे काही परिणाम उदभवल्यास सर्वतोपरी शासनच जबाबदार राहील. यावेळी भाऊसाहेब शेंद्रे, दिनकर दिघे, अमोल सावंत,जगन्नाथ गवळी, अनिल सुरवसे, विजयकुमार सुर्यवंशी,अंकुश पवार,ज्ञानेश्वर मोरे, बालाजी सुर्यवंशी,आण्णा सुरवसे.