अवकाळी पावसात शेतकरी पाण्यात, पण शासन-प्रशासनात छत्तीसचा आकडा कशासाठी 

अवकाळी पावसात शेतकरी पाण्यात, पण शासन-प्रशासनात छत्तीसचा आकडा कशासाठी 



         लातूर (दै. लातूर प्रभात प्र) ः कोरोना-कोविड प्रार्दूभावाच्या प्रसंगी शासन, प्रशासन, पोलीस यंत्रना, लोकप्रतिनिधी हातात हात घालून गळाभेट घेवून कोरोना, कोविड निर्मूलनाच्या लढाईत सज्ज होते तो लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे पंरतू कालच्या अतिवृष्टीमूळे शेतकर्‍याचे पीक हातचे गेले शेतमजूरांना उपासमारीची वेळ आली असताना राज्यात 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्यात 36 जिल्हाधिकारी कारभारी म्हणून वावरत असताना शेतकर्‍यांची शेतमजूरांची दयनीय अवस्था कशी काय होते नुकसान भरपाईसाठी शेतकरी आणी हाताला काम आणी दाम द्या म्हणून शेतमजूर रस्त्यावर कशासाठी अशीच गंभीर चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. 
        आपतकालीन परिस्थितीत प्रसंगानुसार जिल्हाधिकारी याना मदत पूरविण्याचे अधिकार असतातच, जसे केंद्र सरकारने राज्याना दिलेले असतात त्यानुसार लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे कर्तबगार, न्यायीक कारभारी असताना गप्प कसे ते मदत का करीत नाहीत केवळ लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या दौर्‍यातच हजेरी लावून सेवा बजावीत असल्याने त्याना स्वंयभू हक्क हवेत की बदली हवी आहे अशीच उलटसूलट शंकात्मक चर्चा होताना दिसते आहे. 
        कोरोना कोविड निर्मूलनासाठी अहोरात्र तत्पर असलेले जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे अतिवृष्टीत शेतकरी, शेतमजूर अडकले असताना ते गप्पा कसे, शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधीत छत्तीसचा आकडा कसा काय आला अशीच चिंताजनक चर्चा होत असून अवकाळी पावसात शेतकरी पाण्यात आणी शासन, प्रशासनात छत्तीसचा आकडा कशासाठी आला अशीच ओरड होत असून पूर्ववत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी कार्यरत राहून कोरोना कोविड बाधीता प्रमाणेच शेतकरी, शेतमजूरांना साथ द्यावी अभय द्यावे अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी लोकासमोर येत आहेत पण जिल्हाधिकारी का नाहीत अशीही चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या