जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी नियमाचे उलंघन केले आहे का ? जनतेतून उलटसूलट चर्चा 

 जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी नियमाचे उलंघन केले आहे का ? जनतेतून उलटसूलट चर्चा 



 लातूर (दै. लातूर प्रभात प्र) ः उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आणि अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांच्या हस्ते तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी, कर्मचारी हे, आणि तेथील पुजार्‍या समवेत तोंडाला मास्क न लावता, फिजिकल अंतर न पाळता, मुक्त पणे कोरोना कोविड-19 कायद्याचे उलंघन करत असताना दिसून आले, यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई कोण करणार अशी जनतेतून चर्चा होताना दिसते आहे.  सामान्य नागरीकाना कोरोना, कोविड-19 चे निर्बध लादण्यात येतात, गरीब जनता ते नियम पाळतात ही, त्यांच्याकडून उलंघन झाले तर पोलीसाकडून मारहान होते, अपमाणीत कले जाते, दंड वसूल केला जातो, पत्रकार वृतांकनासाठी बाहेर आले तर पोलीसाकडून मारहान होते, अपमाणीत केले जाते, अधिकाराचा रुबाब गाजवून जनतेत वेठीस धरणारे अधिकारी, ते नियम पाळत नाहीत, कायद्याचे उलंघन करतात, त्यांना कोण विचारणार, त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्‍न जनतेतून उपस्थित केला असून जिल्हाधिकारी व इतर उपस्थितानी नियमाचे उलंघन केले आहे का ? असा प्रश्‍न निर्माण झाला असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरीकातून उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या