शिवणी बॅरेजची पाहणी न करणारे माजी पलाकमंत्री आजी पालकमंत्र्यावर घसरतात कशाला !

शिवणी बॅरेजची पाहणी न करणारे माजी पलाकमंत्री आजी पालकमंत्र्यावर घसरतात कशाला !



लातूर (दै. लातूर प्रभात प्र) ः परवा भाजपा किसान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यानी शेतीतील पीक नुकसानीची पाहणी करुन लातूरात पत्रकार परिषद घेवून शेतकर्‍यांना पंचनामा  न करता नुकसान भरपाई द्यावी आणी शेतकर्‍याना हितजपावे शेतकरी हाच जनतेचा श्‍वास असल्याचे स्पष्ट करुन सरकारच्या कारभारावर टीका केली ती भाजपाच्या धोरणानुसार रास्त असेलही पंरतू तत्कालीन भाजपाचे पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यानी शिवणी बॅरेजचे दरवाजे कोणी उघडले, का उघडले, शेतकर्‍याचे होणारे संभाव्य नुकसान, परिसरातील गावोगावांची होणारे पाणी पिण्यासाठी होणारी पडझड लक्षात न घेता किंवा पाहणी न करताच सत्ताधारी पालकमंत्री ना. अमित देशमूख यांचेवर घसरत असल्याने त्यांना घसरगुंडीची आवड आहे की काय अशीच चर्चा होताना दिसते आहे. 


पालकमंत्री ना. अमित देशमूख यांचा लातूरकरानी लातूरात आंबेडकर पार्कवर सत्कार केला.  पण ना. देशमूखानी सरसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिल्यास त्यांचा क्रिडा संकूलातील स्टेजवर सत्कार करीन असा उपहासात्मक टोला लगावला तो शिवणी बॅरेज कसे, कोणी, कोणाच्या सांगण्यावरुन उघडले त्या दोषीवर कारवाईला आग्रह न धरताच माजी पालकमंत्री आणी विद्यमान पालकमंत्र्यावर घसरतातच कशाला अशी संतापजनक चर्चा होताना दिसते आहे.  विशेष म्हणजे पत्रकार परिषद माजी मंत्री अनिल बोंडे यांची असताना आ. निलंगेकर हे स्वतःचीच पत्रकार परिषद कशी म्हणतात अशीही चर्चा पत्रकारात होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या