केंद्रीय कृषी विधेयक शेतकरी हिताचेच महाराष्ट्र सरकारची भुमिका दिशाभूल करणारीच-माजी कृषि मंत्री बोंडे
लातूर (दै. लातूर प्रभात प्र) ः प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी शेतकरी हिताचेच कृषी विधेयक मांडले पण महाराष्ट्र शासन शेतकर्याची दिशाभूल करुन शेतकर्यांच्या हिताविरोधी भुमिका घेत असल्याची टीका भाजपा किसान मार्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यानी लातूर येथे पत्रकाराशी संवाद साधताना केले.
कृषि विधेयकासंदर्भात शेतकर्यात जनजागृती करण्यासाठी माजी मंत्री अनिल बोंडे किसान यात्रेच्या दौर्यावर आहेत. त्यानुसार लातूर दौर्यावर आल्यानंतर श्री बोंडे यांनी पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. शेतकर्यानी सर्वत्र विधेयकाचे स्वागतच केले आहे असे सांगून डॉ. अनिल बोंडे यांनी अतिवृष्टीने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, निवडणूकीत शिवसेनेचे उध्दव ठाकरे हे बांधावर जावून शेतकर्यास मदत केली जाई असे सांगीतले होते, आता ते मुख्यमंत्री आहेत तेंव्हा त्यांनी शेतकर्यास मदत करावी असे सुचविले. सरकार गहाण ठेवा पण शेतकर्याना मदत करा असे ही आवाहन त्यांनी केले.
नापिकी, कर्ज बाजारीमूळे शेतकरी आत्महत्या करतो पंरतू कृषी उत्पन्न बाजार समितीतील दलाल आत्महत्या करीत नाहीत म्हणूनच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी कृषी उत्पन्न बाजार समित्याचे अधिकार रद्द करुन शेतकर्याना शेती माल विकण्यासाठी मुक्त संधी दिली असे स्पष्ट करुन अनिल बोंडे यानी जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी याना दिले होते त्यासाठी भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करण्यास कांही हारकत नसावे असे पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर ते बालले.
भाजपाचे आ. अभिमन्यू पवार आणी आ. रमेशप्पा कराड यांच्या अनुउपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत प्रारंभी माजी पालक मंत्री तथा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री अनिल बोंडे हे येण्यापूर्वीच पत्रपरिषिदेची भुमिका विशद करताना विद्यमान सरकारवर तोंडसूख घेवून दळभद्री सरकार म्हणून उल्लेख करुन लातूरला दोन मंत्री असताना शेतकर्यांशी संवाद न साधता मुंबईतून संवाद साधत असतात अतिवृष्टीमूळे शेतकर्याचा तोंडचा घास गेला पण हे सरकार पंचनाम्याचे नाटक करीत आहे पण तसे न करता सरसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्या, राशी कुजल्या जनावरे पाण्यात अडकून मेली, मरत आहेत त्यावर उपचार न करता केवळ पंचनाम्याचे नाटक कशाला असा सवाल करुन जिरायती-बागायतदारानाही सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहीजे असे स्पष्ट केले. सरकारने ओला दुष्काळ जाहिर करावा अशी ही मागणी केली. पत्रकार परिषद वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जि.प.अध्यक्ष श्री केंद्रे, श्री हाके, इ. अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.