अजातशत्रू शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस पोरकाच
लातूर (दै. लातूर प्रभात प्र) ः लातूरचे भुमिपूत्र, सर्वपक्षीय मित्र, एक अजातशत्रू म्हणून ओळख असलेले माजी लोकसभा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशी पदे भोगून एक न्यायीक प्रशासनाची ओळख करुन दिलेले माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस मोजक्याच लोकानी साजरा केला. एका वृत्तपत्राने लेख-जाहीराती प्रसिध्द केल्या पण कॉग्रेसी बीज लातूरचे नगराध्यक्ष म्हणून आणी वकिलीतून पेरलेल्या शिवराज पाटील चाकूरकर याचा वाढदिवस साजरा करण्याचे भान कॉग्रेसजनाना असू नये याबद्दल उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
पक्षीय राजकारणात टीका टीपण्णी न करणारे आणी कोणाचे एकूण न घेणारे म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांचा लौकीक आहे, मग त्या निवडणूका असोत की राजकारण, सत्ताकारण असो ते अडसर ठरले नाहीत पंरतू गल्ली बोळातले हौसे वाढदिवस साजरा करतात त्यावेळी लेख-जाहिराती येत असतात पण शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसादिनी कॉग्रेसी जेष्ठाना विसर का पडावा अशीही चर्चा होताना दिसत असून केंद्रीय, राज्यस्तरीय बदलत्या राजकारणामुळे लातूरची कॉग्रेसी ओळख संपूष्टात येते की काय अशीच संशयात्मक चर्चा होताना दिसते आहे.