हाथरस येथील बलात्कार प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने श्रृध्दांजली
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर बलात्कार करुन निघृन हत्या करण्यात आली. त्यामूळे देशभरातून निदंणीय घटनेचा तिवृ निषेध होत असून संवर्ण गावगुंडाना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. लातूर येथील रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रा. युवराज धसवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली व राम कोरडे यांच्या संयोजनातून शेकडो महिलांनी हातात मेणबत्या घेवून वैशाली बौध्द विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर मेणबत्या प्रज्वलीत करुन हाथरस येथील मृत दलित तरुणीस श्रृध्दांजली वाहण्यात आली. या प्रसंगी शेकडो महिलांनी सहभाग नोंदवीला. यात शारदा ताई वाघमारे, जयश्री गायकवाड, कोकाटे ताई, लताबाई चिकटे, भारत बाई कांबळे, शेषाबाई गायकवाड, काशीबाई कांबळे, लता ताई शृंगारे, सोनाली गायकवाड, शोभा चिकटे, आदीसह कँडल मार्च चे संयोजक रामभाऊ कोरडे, स्नेहीत गायकवाड, गौतम सोनवने, राजहंस धसवाडीकर, दिपक तलवार, कबीर मस्के, अक्षय शृंगारे, चरण बनसोडे, नितिन गायकवाड, अजय गायकवाड, अजय कांबळे, प्रविण उबाळे, अनिल शिंदे, राजू गायकवाड आदीन सहभाग घेतला होता.
उत्तर प्रदेशातील सदरील घटनेमुळे महाराष्ट्रातही तिव्र पडसाद उमटले असून लातूरात ही रिपब्लिकन सेनेसह विविध संघटनानी तिव्र संताप व्यक्त केला आहे.