वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची अखेर बदली
लातूर (दै. लातूर प्रभात प्र.) ः लोकहिताय, लोक रक्षणाय हे ब्रिद वाक्यवून त्याच धोरणानूसार पोलीस विभाग कार्यरत असतो. पंरतू कांही पेालीस अधिकारी मनमानी कारभारातून वादग्रस्त सेवा बजावीत असतात. महापुरुषांचा अवमान करणे, त्यातच सामाजीक, राजकीय, कार्यकर्ते आणि पत्रकार नगरसेवकानां अरेरावीची भाषा करुन त्यांची बदनामी करण्यातच जे धन्यता मानतात अशा पैकीच एक वादग्रस्त जातीयवादी पोलीस अधिकारी असलेले सचिन सांगळे यांची अखेर कारवाई न करता बदली करण्यात आली त्यामूळे लातूर शहर व जिल्हाभरात शंकात्मक परंतू समाधानात्मक चर्चा होताना दिसते आहे.
लातूर शहर उपविभागीय पेालीस अधिकारी असलेले सचिन सांगळे हे लोकमान्य टिळंक यांची जयंती असेल, किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल, किंवा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यक्रम असोत त्यावेळी याच पोलीस अधिकार्यानी जातीयभावनेतून लोकसमुहावर दडपन आणून वार्ताकंन करण्यासाठी आलेल्या पत्रकारानांही मज्जाव करुन स्वतःचा अधिकार गाजवीला. त्यामूळे लातूर शहरात असे अधिकारी कसे काय आहेत अशी चर्चा होत होती.
लातूर शहर व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिवंगत विलासराव देशमूख यांनी कार्यक्षम अधिकार्याना लातूरात आणले आणि मंत्रालयीन कारभारात ही तेच अधिकारी असत. पंरतू त्यांच्यानंतर लातूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला वाळवी लागली. आणि सचिन सांगळे यांच्यासारखे अधिकारी मस्तावले गेले. आणि मनमानी कारभारातून अवैद्य धंदे, चालू झाले. त्यात अवैद्य मद्य विक्री, मटका, जुगार, आणि रोडराबरीला प्रोत्साहान मिळत गेले. हे सारे कांही सचिन सांगळे यांच्या सारख्या अधिकार्यामूळेच घडत गेले. लातूर जिल्ह्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असतानाही सांगळे यांनी मनमानी कारभार करुन आमजनतेला वेठीस धरले होते.
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली जन्मोत्सव साजरा होत असताना तत्कालीन नगरसेवक, आणि दैनिक लातूर प्रभात, सा. राजकारण भारीचे संपादक रघुनाथ बनसोडे हे वृतांकन करण्यासाठी अण्णाभाऊ साठे चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर उपस्थित असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी तू कसला पत्रकार, तुझी पत्रकारीता काढतो, असे दरडावून हात उगारुन गुन्हेगारासारखे पोलीस गाडीत डांबून शहरात फिरविले आणि आहे त्याच ठिकाणी सोडले. त्यामूळे अण्णाभाऊ साठे, टिळक प्रेमी जनते समोरच नामवंत पत्रकाराची अशी बेअदबी होते, हा प्रकार निषेधार्यच होता. तेंव्हापासून वेगवेगळ्या स्वंयसेवी संघटना, सामाजीक, राजकीय पक्षानी पत्रकार संघटनानी सचिन संागळे हटाव मोहिम हाती घेतली होती त्या संदर्भात पोलीस अधिक्षक, पोलीस महानिरिक्षक, पोलीस महासंचालक, गृहमंत्री, मुख्यमंत्री, पालक मंत्री अशा पर्यंत निवेदने देवून ही कारवाई केली गेली नाही, पंरतू पत्रकारानी पालक मंत्री अमित देशमूख यांना छेडले असताना कोणा अधिकार्याची कोठे बदली करायची आहे ते सांगा मी तत्पर आहे, असे स्पष्ट केले होते, पंरतू कारवाई न करताच केवळ बदली करुन सचिन सांगळे यांना मोकळीक दिली की काय अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
सामाजीक कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार, संपादक असलेल्या रघुनाथ बनसोडे यांचेच सोडा पंरतू पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे, दुरदर्शनचे पत्रकार दिपरत्न निलंगेकर, अशा अनेकांना त्यांनी अवमानकारक शब्द वापरुन वागनूक देवून मारहान केली. पंरतू रघुनाथ बनसोडे यांनी असे अधिकारी नसावेत यासाठी नेहमीच आंदोलने केली, पंरतू तत्पूर्वीच पोलीस अधिक्षकांची बदली झाली, आणि पुन्हा वड्यावरचे तेलं वांग्यावर कशाला म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची बदली केली गेली, परंतू वादग्रस्त जातीयवादी असलेल्या पेालीस अधिकारी सचिन सांगळे यांच्यावर कारवाई का केली गेली नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच असल्याने लातूर शहर व जिल्हाभरातील सामजीक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, संपादक, पालक मंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अशा अधिकार्यावर काय कारवाई करणार आहेत याकडेच लक्षदेवून असल्याचेच दिसते आहे.
विशेष म्हणजे उपविभागीय पेालीस अधिकारी सचिन संागळे यांची बदली झाल्याचे वृत्त वार्यासारखे पसरले असून प्रत्येक कार्यकर्ता, पत्रकार समाधान व्यक्त करीत असून केवळ सर्व पत्रकार, सामाजीक कार्यकर्ते, राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते, व दैनिक लातूर प्रभातचे संपादक यांच्या भुमिकेमूळेच सांगळे यांची बदली झाली म्हणून चोहीकडूनच अभिनंदन व्यक्त होताना दिसते आहे. त्यातच बदली होणार असा अदांज येताच अधिकाराचा वापर करुन अवैद्य दारु विक्रेते, मटका जुगार खेळणार्या एंजटाकडून माया जमवीली असल्याचीच चर्चा होत असली तरी त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असून लातूर शहरातला असा जातीयवादी वादग्रस्त अधिकारी बदलून गेला यातच सर्वसामान्य जनता धन्यता व्यक्त करीत असताना दिसते आहे.
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची अखेर बदली
वैशिष्ट्यीकृत बातम्या
ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...
-
लातूर (पोअका) : लातूर तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह लातूर पोलिसांनी सतर्कता दाखवत मुला-मुलीच्या आई वडिलांचे प्...
-
लातूर ( जिमाका), दि. 12 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य श...
-
लातूर : राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खरे अर्थाने भारताच...
-
लातूर, दि. 8 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी...