झरोका
एक - ऐका हो ऐका, कामगार, मजूराना कोणी वाली आहे काय, मजूर गेले, शेतकरी संपतोय आता कामगार आडकित्यात आहेत कोणी ऐकाल, पूढे याल काय, असे अवचित, अघटीत कसे काय घडते आहे हेच विचारतोय.
दुसरा - अरे, असे कशाला ओरडतो आहेस, तूझ्यावर आभाळ कोसळले आहे काय, कशाला बडबड करतो आहेस. काय घडले ते तरी सांग म्हणजे काय ते कळेल आणी मार्ग शोधता येईल.
एक - अहो काय सांगू, केंद्र सरकारने शेतकर्याना नागविले आणी महाराष्ट्र शासनाने ओबीसी, मराठा समाजात तणाव निर्माण केला उद्या काय होईल हे सांगता येत नाही म्हणून चिंता वाटतेय.
दुसरा - शेतकर्यांच्या प्रश्नावरुन उत्तरप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री बसपानेत्या बहन मायावती यानी केंद्र सरकारला अडचणीत आणले आहे तर महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यानी कंबर खेचली आहे त्यामूळे चिंता करण्याचे कारण नाही. कशाला काळजी करतो आहेस.
एक - समाजकारणी, राजकारण, सत्ताकारण कांहीही असो पंरतू विनाकारण जनतेला वेठीस धरले जाते आहे त्यामूळे सर्वसामान्य नागरीकांना कसा न्याय मिळणार हीच खरी अडचण वाटते त्यामूळे डोंक सून्न झाले आहे म्हणूनच खरे बोलतो आहे.
दुसरा - समाजकारणी, राजकारणी, सत्ताकारणी आणी मतदार खरे बोले असते आणी तशाच विचारातून वागले असते तर आज घडीला शेतकरी, मराठा समाज आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता, तू काय हा हेका धरुन बसलास.
एक - अहो तूम्ही सत्ताधारी पक्षाचे की, विरोधी पक्षाचे आहात हेच कळत नाही. मी शेतकरी, शेतमजूर, कामगारासंदर्भात बोलतोय, कालच कामगारासंबधी कायदा पारीत केला. संघटीत, असंघटीत कामगाराचे हक्क हिरावून घेतले जात आहेत हे शासन आहे दुःशासन आहे हेच कळत नाही म्हणून बोलतोय.
दुसरा - अरे दुरगामी न्याय आणी फायदा समोर ठेवून केंद्र शासन व राज्य शासन हे असे निर्णय घेत आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षीत बेकार, बेरोजगार हे पूढील काळात उपासी मरणार नाहीत. आर्थीकदृष्ट्या सक्षम होतील हेच शासनाचे धोरण आहे विशेष म्हणजे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अस्सल शेतकरी आहेत, त्याना शेतकरी, शेतमजूर, कामगाराची समस्या अवगत आहे, म्हणूनच ते असे निर्णय घेत आहत हे तूला कसे कळत नाही.
एक - अहो, सारे कळते आहे पण पोटाची आग विझत नसल्याने वळत नाही, आजच नाही तर उद्या कशाला हेच आजचे, आमचे धोरण महत्वाचे आहे त्यासाठीच ही ओरड आहे ओरड...!
झरोका...
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, खालील मार्गावर ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...