झरोका....

झरोका


एक - सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा सवाल इंग्रज,ब्रिटीश सरकारला लोकमान्य टीळकानी केला होता तसे विचारणा कोणी पत्रकार करत नसला तरी लोक दबक्या आवाजातून केंद्र सरकार प्राप्तीकर विभागाच्या हातून असे,कसे अवचित कारवाया करीत आहे अशीच चर्चा होताना दिसते आहे.  केंद्र सरकार हे प्रशासनाला बळीचा बकरा बनवित आहे की काय अशीच शंका येते आहे कांहीच कळत नाही. 
दुसरा - अरे असे गोलमाल कशाला बोलतोस, तु कांही संपादक आहेस काय, ते खरेच लिहीतात आणी दुसर्‍यावर घालतात असेच बोलतो आहेस, केंद्र शासन किंवा प्राप्तीकर विभागाने काय केले ते खरं काय ते सांगशील. 
एक - लोकसभा निवडणूकीतील २००९,२०१४,२०१९ या निवडणूक संदर्भातील प्रतिज्ञापत्रातील माहीती लपविली आहे ती खरी की खोटी या तपशिलासाठी शरद पवार यानां प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठविलीय, यापूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणी आदित्य ठाकरे यानांही विधानसभा, विधान परिषद निवडणूकीतील तपशिला संदर्भात नोटीस पाठविली असून खा. सुप्रिया सूळे यानांही तशीच नोटीस पाठविली आहे म्हणे मग हे सुडाचे राजकारण तर नव्हे असेच वाटते आहे. 
दुसरा - केंद्र सरकार हे लोकनियुक्त सरकार असले तरी प्राप्तीकर विभाग हा प्रशासनाचा एक भागच असतो तक्रार किंवा संशययूक्त अर्ज आला तर तशी चौकशी करावीच लागते त्यात केंद्र सरकारची चूक कशी असू शकते. 
एक - कांही तरीच बोलता, केंद्रीय मंत्रीमंडळ असो की, राज्य मंत्रीमंडळ, हे लोकनियूक्त असले तरी अधिकारी, कर्मचारी वर्गाची निवड ही शासनच करीत असते.  त्यामूळे प्रधानमंत्री नरेंद्र मेादी यांच्या सांगण्यावरुनच प्राप्तीकर विभागाने तशी नोटीस दिली असावी आजघडीला शासनाच्या परवानगी शिवाय अधिकारी कांहीच निर्णय घेवू शकत नाही एवढी  दहशत शासकाची आहे चोहीकडेच चालू आहे.
दुसरा - असे कसे होईल, शरद पवार यांची करंगूळी धरुन राजकारणात आलोय म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी सांगतात, मागील काळात ते अनेकवेळा एकाच व्यासपिठावर आलेले आहेत असे होणे शक्यच नाही. 
एक - कांहीही म्हणा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी द्वेषमूलक, कुत्सित, असुत्रे पोटीच्या भावनेतूनच शरद पवार, सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे याना प्राप्तीकर विभागाकडून तशा नोटीसा पाठविल्या असतील कारण शरद पवार यानीच उध्दव ठाकरे याना भाजपाला डावलून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविले आहे.  खा. सुप्रिया सुळे या लोकसभेत सरकारला कोंडीत धरतात म्हणूनच एक डावपेच म्हणून तसे केले असावे असे वाटते. 
दुसरा - प्राप्तीकर नोटीस प्रकरणी तर शरद पवार यानी आमच्यावरील प्रेमाखातर आभार मानले आहेत त्यांचे काय.
एक - शरद पवार आहेत ते, मुत्सद्दी राजकारणी आहेत, दगाबाज, विश्‍वासघातकी नाहीत, काट्याने काटा काढतात एवढेच, समजले.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या