संपादकीय...
अखंड भारतासाठी हवन कशाला...
भारत हा सार्वभौम आहे. लोकशाहीवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, भारत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय राज्य घटनेनुसार चालतो आहे. सामाजीक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय व हक्काची जोपासणा करीत विविधतेतून एकता निर्माण करुन विविध जाती-धर्माचे लोक एकत्रीतपणे, समुहाने गुण्यागोविंदाने वावरत आहे. भारत हा विविध जाती, धर्म, रुढी परंपरा, चालीरितीचा असला तरी अखंड एकसंघ आहे असे असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिल्ली येथील भाजपा कार्यकर्त्यानी अखंड भारत हेच लक्ष्य म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केला त्यात भटजी, पुजार्याना बोलावून पूजा, हवन केले हे लोकशाही भारतातले पहिले पंतप्रधान असावेत की ज्यानी भाजपा कार्यकर्त्याकडून हवन करवून घेतले याबद्दल आश्चर्य व्यक्त होताना दिसते.
कौटूंबीक समूहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा न करता तो देशपातळीवर करण्यात येत असल्यास त्यात कांही गैर नाही हा भारतीय नागरीकासाठी स्वाभिमानाचीच बाब आहे, असावी पण एक भारत-श्रेष्ठ भारताचे शिल्पकार हे नरेंद्र मोदी हेच असावेत हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यानी स्पष्ट केल्याने लोकशाही पूजेपेक्षा व्यक्ती पुजेलाच अधोरेखित केल्याने भारतीय नागरीकांचे, बाराबलूतेदाराचे, श्रमिक, कष्टकरी, कामगार, मजूराची जी अडवणूक, वाताहत होत आहे त्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही. पण खूर्ची डळमळते की काय या भितीपुढे समाज माध्यमातून वेगवेगळ्या सुचना, प्रतिक्रया, प्रकट झाल्या त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यसतरीयही असल्याने मराठा-आरक्षण निर्माणावरील निर्बध उठविण्याचे सत्यकार्य भाजपा नेते उघड करुन आमजनतेला पाठवित आहेत त्यामूळे उद्याचे, आजचे समर्थन किंवा विरोधाभास ही शिकंराणी आहे असेच म्हणावे लागेल, कारण अनुसूचित जाती जमाती असतील ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या विमूक्त जाती, जमाती असतील त्याना दिलेल्या सवलतीही घटनादत्तच आहेत त्यानुसार मराठा समाजालाही ज्या राखीव जागासंदर्भात आरक्षण आणी स्थगती दिली आहे ती पून्हा फेरविचारानेच प्राप्त केली पाहिजे ते होईल हे निर्विवाद सत्य असावे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदित्यनाथ योगी यंाचे भाष्य, लेखन आणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शुभेच्छा निमित्त मात्र असल्यातरी दिल्लीस्थित भाजपा कार्यकर्त्यानी अखंड भारतच एक लक्ष्य ही भुमिका पूढे केल्याने लोकशाहीतून एकाधिकारशाही अस्तित्वात येण्याचा धोका अधिकतेने स्पष्ट होताना दिसतो आहे ही बाब एकसंघभारतासाठी धोकादायक वाटते यात संदेह नसावा अशीच चर्चा होताना दिसते आहे.
भारत हा विविध जाती धर्माचा आहे, त्यावरच समाजकारण, राजकारण, सत्ताकारण, चालते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत किंवा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी असोत अथवा फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असोत ते सर्व जाती-धर्माच्या मतदाराच्या मतदानातूनच विजयी झालेले असताना अख्खा भारत एकजूट असताना अखंड भारत हे लक्ष्य आहे भाजपावाले म्हणत असतील तर यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणी, भाजपाच्या अमितशहा, जे.पी.नड्डा आणी नरेंद्र मोदी यांचीच चेतावणी असावी अशीच चर्चा देशभरात होत असली तरी सर्वच जातीतील मागास कुटूंबातील लोक मात्र चिंतीत होत असल्याचे चित्र दिसते आहे.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे म्हणून सारे जग भारावलेले दिसते त्यात लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष, सामाजीक न्याय, समानता, स्वातंत्र्याची बंधू भावाची राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी भारतीय राज्यघटना हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून परेदशी शासक घेवून जातात. आपापल्या देशात भारतीय संवीधानाची पुर्नरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा करतात. आणी भारतात मात्र भारतीय राज्य घटनेला छेद देण्याचे धाडस करुन एकजूट, एकसंघ भारत असताना मुद्दामपणे जातीय,धर्मांध विष पेरुन अखंड भारत निर्माणण्याची संकल्पना पुढे करुन दिशाभूल केली जाते ती समाजविघातकी देशघातकी असावी अशी चर्चा होत असून भारत अखंड करु पाहाणार्यानी भारत कधी पासून विघटीत, विखूरलेला आहे हे ही स्पष्ट करावे अशीही आव्हानात्मक चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. ती नाकारता येत नाही.
केवळ व्यक्ती पूजा आणी मोदी, मोदी म्हणून देशाचा विकास किंवा अखंडपना टीकणारानाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती-वृत्ती असावी लागते. केवळ तूणतूणे वाजवून पोट भरु शकते. जगण्यासाठी जागा मिळते पण त्यातून भारतीयत्व आणी लोकशाही, माणूसकी एकात्मता मिळत नसते ते योगी महाराजासह दिल्लीतील मेादी धार्जीण्यानी लक्षात घ्यावे, अखंड भारतासाठी म.गांधी, पंडीत नेहरु, लालबहादूर शास्त्री, सरदार वल्भभाईपटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी डॉ. राजेंद्र प्रसादानीच सर्वकांही केलेले आहे. तूम्ही आम्ही सारे भामटे, भारतासाठी-लोकशाही-संविधानाबद्दल बोलणारे कोण आहोत याचाही आत्मनिरिक्षणातून करणे गरजेचे आहे असे वाटते. लोकशाहीचा चार खांबापैकी एक खांब असलेली पत्रकारीता कोठे गुळ खात बसते आहे अशावेळी ती गप्प का बसते याबद्दलही आमजनतेत चिड व्यक्त होताना दिसते आहे. त्यामूळे हवनातून अखंड भारत होत नाही त्यासाठी त्याग, समर्पण गरजेचे असते हेच अर्धसत्य असावे.