झरोका
एक - कांहीही असो भाजपाने राज्य सरकारला जेरीस आणले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार वगैरे लोकप्रतिनिधी भाजपा समोर फिके पडत आहेत. कधी नव्हे ती महाराष्ट्र सरकारची नाचक्की होताना दिसते आहे. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास मोडीत निघतो की काय अशीच भिती वाटते आहे.
दुसरा - अरे, महाराष्ट्राचा इतिहासच काय समाजकारण, सत्ताकारणही भाजपा मोडीत काढू शकत नाही. मागचे जाऊ दे बाळासाहेब ठाकरेच्या बळातून भाजपा मोठी झाली ती प्रमोद महाजन आणी गोपानाथ मुंडेच्या मध्यस्थीतूनच हे आजचे भाजपचे कोण बुजगावणे आहेत महाराष्ट्राचा इतिहास मोडीत काढणारे.
एक - अहो, राग धरु नका, मराठा आरक्षण, दुध वाढ, साखर, कांदे या प्रश्नावर भाजपा आक्रमक झाली आहे त्यामूळे सरकारची कोंडी होत आहे म्हणून बोलले गैरसमज करुन घेवू नका.
दुसरा - प्रत्येकाना घरचा प्रश्न तात्काळ सोडविता येत नाही. हे तर सरकार आहे तेही तिन खंाबी त्यात पत्रकार लक्ष ठेवूनच आहेत सर्वांनी विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. मराठा आरक्षणा संदर्भात सरकार खंबीर आहे ते मिळविणारच आहेत. कांदा, दुध, साखरच नव्हे कारखानदारीसाठी स्वतः शरद पवारच आक्रमक आहेत मग भाजपाचे आंदोलन कशासाठी हे सांग.
एक - अहो तूम्ही लई वर गेलात मी कालचे, आजचे बोलतोय. मराठा समाजाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सेनेच्या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आंदोलने केली त्यामूळे लोकात गैर समज होतो आहे म्हणून बोलतोय.
दुसरा - अरे, मराठा समाजाला आरक्षण हवे आहे ते मिळणारच आहे. ठरवून आंदोलने कशाला करायची, सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी विधानसभा, विधान परिषदेत आहेत त्यांनाही घेराव घाला. ही केवळ भाजपाची चाल आहे. त्याना तरी कोठे मराठा आरक्षणाचा पूळका आहे केवळ हिंदूत्व आणी मोदी-मोदकच त्याना हवे असेल दुसरे काय.
एक - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,शरद पवार, अशोक चव्हाण यंाचेवरच टीका करीत आहेत आंदोलने कशासाठी हेच कळत नाही म्हणून बोलतो आहे.
दुसरा - अरे, भाजपाकडे कसलाच मूद्दा, विषय नाही, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंगसचे सरकार असल्याने ते आपापल्या अजेंड्यानुसार कार्यक्रम राबवित असल्याने भाजपा केवळ कधी दुध दर वाढ तर कधी साखर हमी भाव किंवा कोरोना, कोविड निर्मूलनासाठी स्वस्त ऑक्सिजन मिळावा म्हणून आंदोलन करीत आहेत पण स्थानीक प्रशासनाला सर्वकांही काय चालते ते कळते पण तूम्हालोकाना वळत नाही, भाजपा, भाजपा, मोदी फडणवीस करीत बसता समजले का ?