झरोका
एक - कांही राज्यात शाळा सुरु होणार आहेत. पण महाराष्ट्रात शाळा कधी होतील हे सांगता येत नाही ऑन लाईन शिक्षण प्रणालीमूळे ग्रामीण भागातील मुले, मुली शिक्षण सोडून शेतीवर अन्य धंद्याकडे त्यांचेच पालक घेवून जाताना दिसत आहेत. शैक्षणीक प्रगती खुंटती की काय अशीच भिती वाटते आहे.
दुसरा - तसं कांही नाही ऑनलाईन माध्यमातून टी.व्ही. लॅपटॉप, फोन द्वारे सारे कांही सुरळीत चालू आहे. तसा प्रत्येक संस्था, शाळेतील मुख्याद्यापकाचा अहवाल आहे. उच्चवर्णीय असो की माध्यमवर्गीय असोत सर्वच स्तरातील मुले, मुली ऑन लाईन शिक्षण घेत असल्याची नोंद दिसते गैरसमज करुन घेवू नये.
एक - अहो तसं नाही ग्रामीण भागातील अनेक शेतमजूर, मागासवर्गीय, दलिताकडे, कामगाराकडे साधा मोबाईल नाही, टी.व्ही. लॅपटाप, स्मार्ट फोन तर सोडाच मग ते ऑनलाईन शिक्षण कसे घेणार, एका संख्येने तसी तपासणी केली असता अनेक मुले, मुली आई, वडिलासोबत शेतीतल्या कामासाठी जात आहेत तर कांही मूली टेलरींग सारख्या व्यवसायाची शिकवणी घेतात सद्यातरी कोरोन, कोविड निर्मूलणासाठी मास्क शिवणे, विकणे, अशीच कामे करताना दिसतात, चिंताग्रस्त वातावरण आहे असे वाटते.
दुसरा - शिक्षण घेत राहणे गरजेचेच आहे पंरतू असे छोटे मोठे धंदे केले तर काय बिघडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यंाचीच स्किल इंडिया, किमान कौशल्य योजनेतीलच हा एक व्यवसाय आहे बारा बलूतेदारासाठी ही एक संधीच आहे. शिक्षण घेतलेले किती बेकार आहेत. आईवडीलाना जड झालेत छान आहे मूले मुली मास्क शिवतात, विकतात ही तर सरकारला हातभार लावण्याचाच एक भाग आहे. अशीच प्रगती साधली पाहिजे.
एक - हे काय सांगता अर्धवट शिक्षण सोडून असली हमाली करायची, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी तर उच्चशिक्षीत व्हा, शासक, प्रशासक बना म्हटले आहे. आणी तूम्ही शिक्षणात काय आहे धंदाच महत्वाचा म्हणता, असे उपरट, घातकी कसे बोलता.
दुसरा - तसं कांहीही नाही, मी ही तूमच्यातलाच आहे, तूम्ही मला निवडून दिल्याने मी लोकप्रतिनिधी झालो म्हणून पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या योजना मला सांगाव्याच लागतात तसं नाही केलो तर मला पून्हा संधी मिळणार नाही, समजलं.
एक - म्हणजे तूम्ही राजकारणासाठी शिक्षण वगैरे कांही नाही धंदा महत्वाचा म्हणता काय, उद्याला मतदानाला या म्हणजे बटन कळत नाही आम्ही मतदान करायला येत नाही म्हटल्यास कसे वाटेल.
दुसरा - तसे समजू नका, मतदानाचा अधिकार आहे तो गाजविलाच पाहीजे बाबासाहेबानीच एक व्यक्ती, एक मुल्य, एक मताचा अधिकार दिला आहे. निवडणूक काळात मतदान कराच बरे का.
एक - म्हणूनच आम्हाला शिक्षण पाहीजे, ग्रामीण भागात सरकारनं गरजू मुला मुलीना टी.व्ही. स्मार्ट फोन, लॅपटाप खरेदी करुन द्यावेत ते समूहातून शिकतील, शहरी, ग्रामीण असा भेद नको, न्याय व हक्कास शिक्षण ही पाहीजे. त्या पंतप्रधान आणी मुख्यमंत्री जे कोणी आहेत त्याना सांगावा आज समजलं.