कोरोना कोविडमुळे आलेली आर्थिक अवकळा भरुन काढतेय

कोरोना कोविडमुळे आलेली आर्थिक अवकळा भरुन काढतेय,खरेदी-विक्रीतून दुय्यम निबंधक कार्यालय


 लातूर (दै. ला.प्रभात प्र) ः गेली आठ महिणे कोरोना कोविड प्रादूर्भावामूळे लातूर शहर व ग्रामीण भागातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते पंरतू टाळेबंदीची शिथीलता आल्यापासून शेती, जमीन, जागा, प्रॉपर्टीच्या खरेदी, विक्री व्यवहाराला तेजी आली असून कोरोना कोविडमूळे आलेली आर्थीक अवकळा दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी भरभरुण खरेदी, विक्री व्यवहारातून वसूली करीत असल्याची चर्चा महसूल विभागात होताना दिसते आहे.  ती वास्तव असावी. 
 दै. लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने लातूर येथील दस्तऐवज नोंदणी व विक्री करणार्‍या दुय्यम निबंधक कार्यालय नंतर एक व दोन कार्यालयात व्यवहार करणार्‍या लोकांशी संपर्क साधला असता, शासकीय खर्चा ऐवजी इतर मावेजाही वसूल केला जात असून पाच, दहा लाखाच्या खरेदी विक्री व्यवहारात शासकीय फिस ऐवजी हजारो रुपये अधिकार्‍याच्या नावावर स्टॅम्प विक्रेते वसूल करीत असल्याची चर्चा असून ती रक्कम संबंधीत अधिकार्‍यानी सायंकाळी सहा नंतर दिली जाते अशी खूले आम चर्चा होत असली तरी पाठीमागेच असलेले लाचलूचपत कार्यालय आंधळे कसे काय अशीही चर्चा होताना दिसत असून यातील दुय्यम निबंधक अधिकारी आणी लाचलूचपत अधिकारी यांच्यात कांही गौडबंगाल असावे की काय अशी ही चर्चा होताना दिसते आहे.
 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या