पदवीधर मतदार संघातील रमेश पोकळे हे भाजपा की कॉग्रेसचे उमेदवार !
लातूर (दै.ला.प्रभात प्र) सत्ताकारणात विलासराव देशमूख आणी सुशिलकुमार हे दोन हंस होते तर राजकारणात विलासराव देशमूख आणि गोपीनाथराव मुंडे हे हंस होते म्हणूनच लातूर-बीड च्या राजकारणात देशमूख-मुंडे यानी हस्तांतर केले नाही हे विशेष आहे.
अशा परिस्थितीत कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण हे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार असले तरी त्यांच्या प्रचारार्थ अनावश्यक आघाडी घेवून त्याना पराभूत करण्याचाच डाव महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याची चर्चा मतदारात होत असून भाजपा आघाडीचे शिरीष बोरुळकर की रमेश पोकळे हे उमेदवार आहेत याची अनिश्चितता असल्याने मतदारात संभ्रम होताना दिसतो आहे.
रमेश पोकळे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र गळ्यात अडकवून मतदानाची मागणी करीत असून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या मौन बाळगून बोरुळकरांचा प्रचार, प्रसार करीत असल्यातरी पदवीधर मतदार संघातील बंडखोर भाजपा नेते रमेश पोकळे हे कॉग्रेसचे की भाजपाचे अनाधिकृत, अंतर्गत उमेदवार आहेत अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.