पदवीधर विधान परिषदेच्या निवडणूकीत जांभळ्या शाईचाच वापर करावा - जिल्हाधिकारी जी श्रीकांत
लातूर (दै. ला.प्रभात प्र) औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया चालू असून एक डीसेंबर 2020 रोजी होणार्या मतदान यंत्रणेसंदर्भात लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी पत्रकार परिषद घेवून संबंधीत प्रक्रियेसंदर्भात अधिकारी व मतदाराना सूचना देवून, भारत निवडणूक आयोगान पुरवलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच मदतनासाठी वापर करावा, व सदरील निवडणूक न्यायीक प्रक्रियेत पार पाडावी असे सूचित केले.
लातूर जिल्ह्यातील एकून 88 मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी होमगार्ड राहाणार असून मतदान केंद्रापासून शंभर दोनशे, मिटरचे अंतर बंधनकारक ठेवले असून मोबाईल वापरासही बंदी राहाणार आहे, त्यात कोणताही मतदार अमिषाला बळी पडूनयेसाठी मद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोना,कोविड 19 सॅनिटायझर चा वापर अनिवार्य केला असून जिल्हास्तरीय कंट्रोल रुमच्या माध्यमातून 88 मदतदान केंद्रावर काय घडते आहे यांची निगराणी होणार आहे. 31 क्षेत्रिय अधिकारी यांचे वाहनासह मतदान पथकाची मतपेट्यासह वाहतूक करणार्या 88 वाहनांना जीपीएस ट्रॅकिगंचा वापर असल्याने जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यानी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मतदानासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहक परवाना, पारपत्र, कंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ स्थानीक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्यगीक घरणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळख पत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, सबधित पदविधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदविधर/शिक्षक मतदाराना वितरीत केलेले सेवा ओळख पत्र, विश्वविद्यालया द्वारे वितरीत पदवी/पदवीका मुळ प्रमाण पत्र, सक्षम प्राधिकरणाद्ववारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाण पत्र, यांचें ओळखपत्र अनिवार्य केले असून त्यासंबधी खुलासावार माहिती जी श्रीकांत यानी दिली, सदरील पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, पत्रपरिषदेस जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी लातूर शहर सचिन सांगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लातूर, डॉ. सुनिता शिंदे, अदी उपस्थितीत होते.