मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षाच्या नियोजन समिती सदस्यपदी आ. अभिमन्यू पवार...

        लातूर :  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल १३ महिने २ दिवसांच्या कालावधीनंतर मराठवाडा हैदराबाद संस्थानातून मुक्त झाला. या लढ्याच्या स्मतिप्रीत्यर्थ दरवर्षी १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीदिन साजरा केला जातो. यावर्षी या स्वातंत्र्य लढ्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्य शासनाने १५ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी समितीत औशाचे आ. अभिमन्यू पवार, डॉ. शिरीष खेडगीकर (बीड), निशिकांत भालेराव (औरंगाबाद), श्रीमती सूर्यकांत पाटील (नांदेड), अॅड. आशिष वाजपेयी (लातूर),राजकुमार घुरगुडे (उस्मानाबाद), डॉ. उर्मिला चाकूरकर (नांदेड), डॉ. रश्मी बोरीकर (औरंगाबाद), सिनेगायक उदय वाईकर (परभणी), अॅड. जी. आर. देशमुख (परभणी), डॉ. वामनराव चटप (चंद्रपूर), सुभाष जावळे (परभणी), नितीन चिलवंत, दीपक ढाकणे व लक्ष्मण निकम यांचा समावेश आहे. ही समिती मराठवाडाभर केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करणार आहे.
       आमदार अभिमन्यू पवार यांच्या या निवडीचे स्वागत औसा विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांकडून करण्यात येत आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या