शिवसेना लातूर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी संतोषभाऊ सोमवंशी

       लातूर : महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपभापती तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांची लातूर जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सह संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी ही नियुक्ती शिवसेना मुखपत्र सामनातून जाहीर केली असून या निवडीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
      शिवसैनिक अशी ओळख असलेल्या संतोषभाऊ सोमवंशी यांची राजकीय कारकीर्द औसा तालुक्यातील धानोरा गावच्या सरपंचपदापासून झाली. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या कार्यकर्तृत्वाच्या व जनसेवेच्या बळावर आगेकूच करीत धानोरा गावचे १० वर्षे सरपंचपद त्यांनी भूषविले. त्यातूनच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष म्णून जवळपास ५ वर्षांची त्यांची कारकीर्द गाजली. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून त्यांनी महिला बचत गटांना सक्षम करीत महिला सक्षमीकरणाचे काम केले. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांचे काम वाखाणण्यासारखे झाले. २०१३ ते २०१५ अशी तीन वर्षे शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणूनही यशस्वी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना जिल्हा प्रमुखपदाची संधी दिली आणि ऐन दुष्काळी परिस्थितीत सोमवंशी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात मोठे काम करीत पक्ष संघटन मजबूत केले. गेल्या वर्षभरापूर्वी सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघावर संचालक व पुढे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. औसा तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करुन आजतागायत संतोषभाऊ संघाचे सभापती म्हणून काम करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा हमी भाव फरकाची लाखोंवर रक्कम मिळवून देण्याचे कामही संतोषभाऊंनी केले. शेतकरी कष्टकर्याचा नेता अशी ओळख असलेल्या संतोषभाऊंना आता संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. दरम्यान या निवडीचे जिल्ह्यातील शिवसैनिकांतून जोरदार स्वागत होत आहे.


---------------------------------

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या