मोदींजीचे ९ वर्ष शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाचे - माजी आ. पाशा पटेल

      निलंगा - देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेले काम उल्लेखनीय असून त्यांच्या या ९ वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडली.याच काळात त्यांनी ३ कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला होता. हे कायदे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असताना ते टिकले नाहीत. कारण त्या विरोधात देशातील सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांनी विरोध केला. मात्र दुर्दैवाने हे कायदे वाचविण्यासाठी शेतकरी एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे हे कायदे परत घेत असताना मोदींजीनी आपण विरोधकाना हे कायदे समजावून सांगण्यात कमी पडलो असल्याचे सांगितले. मात्र हे कायदे लवकरच अभ्यासपूर्ण होवून लागू होतील असा विश्वास माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. 
        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला @९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय संपर्क अभियान अंतर्गत औसा मतदारसंघातील कासारसिरसी येथे (दि. १६) जुलै रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बाजीराव पाटील यांच्या शेतात टिफिन चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी माजी आमदार पाशा पटेल यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षातील काळात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती हि माहिती घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, औसा भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे,महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना ढविले, बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, सुशीलदादा बाजपाई, सुनील उटगे, लहू कांबळे, बाजीराव पाटील, कंटिअण्णा मुळे, बळीराम पाटील, धनंजय भोसले, नितिन पाटील, ओम बिराजदार, गोरख होळकुंदे,जिलानी बागवान, धनराज होळकुंदे, परमेश्वर बिराजदार,युवराज बिराजदार, मल्लिकार्जुन दानाई, नाना धुमाळ, बालाजी बिराजदार, आनीस बागवान, संजय कुलकर्णी, रमेश वळके आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ऊस नियंत्रण मंडळावर निवड झाल्याबद्दल कृषी भूषण धनंजय भोसले तसेच मागील रब्बी हंगामात विक्रमी हरभरा उत्पादन घेतल्याबद्दल प्रयोगशील शेतकरी अभिषेक अशोकराव पाटील व त्र्यंबकराव पाटील यांचा सत्कार करण्यात आले.
         यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या काळातील कामांचा दाखला देत मोदींजीच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता होत होईल नरेंद्र मोदी यांच्या दुरदुष्टीतून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असल्याचे सांगून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरल अॅपव्दारे प्रत्येकांना जोडण्याचे काम करावे.मोदी @९ च्या माध्यमातून प्रत्येक घरात नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती देण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी दिले. यावेळी मतदारसंघातील पक्ष बांधणीच्या संदर्भात गटनिहाय आढावाही घेण्यात आला. 






.............. फोटो....

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या