महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न !

             लातूर (दैलाप्रप्र) : आयुष मंत्रालय, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि शिक्षण सहसंचालक कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड यांच्या निर्देशानुसार श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आयक्यूएसी, क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून २०२४ रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.
       या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, एन.सी.सी.चे कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे आणि  कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
यावेळी प्रसिद्ध योगाचार्य ॲड. विजयकुमार सलगरे आणि कु. प्रणिता सलगरे यांनी प्रात्यक्षिकासह योग आणि प्राणायामाच्या भस्त्रिका, मयूरासन, वज्रासन, पद्मासन, अनुलोम-विलोम आणि मकरासन आदी विविध प्रकाराची माहिती देण्यात आली. 

       यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, प्रत्येकाने योग आणि प्राणायाम नियमितपणे केल्यास त्याचा फायदा शरीर आणि मनासोबत दैनंदिन कामकाजासाठी सुद्धा होतो त्यामुळे आपण शरीर आणि मनाने प्रसन्न राहतो असे सांगून सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.  
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार  कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी यांनी मानले
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील कुस्ती पटू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. आशिष क्षिरसागर, प्रा. विष्णू तातपुरे, डॉ. अभय कुमार धाराशिवे, महादेव स्वामी, रत्नेश्वर स्वामी, यशपाल ढोरमारे, सय्यद जलील, बालाजी डावकरे, आनंद खोपे, रंगनाथ लांडगे यांनी परिश्रम घेतले.  

वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या