माजलगाव नगरपालिकेला वालीच नाही, सर्वत्र उडवाउडवीचाच प्रकार  सामान्य जनता मुग गिळून गप्प कसे !

       माजलगाव (रविंद्र राऊत) : येथील  नगरपालिकेचा कारभार हा कोण? चालवतो ते सामान्य जनतेला कळत नाहीय.कारण जो तो कर्मचारी यांचेकडे जा,त्या साहेबाकडे जा,असे उडवाउडवीची भाषा केल्या जाते.त्यामुळे या नगरपालिकेला वालीच राहील नसल्याचे चित्र दिसून येते.या नगरपालिकेत काही कर्मचारी तर शिपायाचे पद असताना काही वरिष्ठांची मर्जी राखत प्रत्येक काम हे त्या व्यक्तीला विचारात घेतल्या शिवाय होत नाही.   
       तसेच नुकत्याच येथील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे चक्क त्या कर्मचाऱ्यांना कोणत्या पावत्या  कोणाकडे व किती भराव्या लागतात हेच  माहित नसल्याने सामान्य जनतेची मात्र ये जा  करण्यात दमछाक होत आहे.तसेच कार्यालयीन अधिकार हा नावालाच असल्यागत परिस्थिती येथे जाणवत आहे.तर मुख्याधिकारी हे रेस्टहाऊसला येतात आणि येथूनच आपले खास माणसाकडून हवे तसे काम करून घेतात.यामुळे या नगरपालिकेला कोणी वाली आहे कि नाही,हे सामान्य जनतेला न कळलेले कोडे पडत आहे.कार्यालयीन अधिकारी हे नामांतर फी,पीटीआर वरचा बोजा कमी करणे,बोजा घेणे साधी पीटीआर मागणी केल्यावर ती विशिष्ट्य व्यक्तीने सांगितल्यावर तात्काळ आगाऊ फि वसूल करून दिल्या जाते तर काही नागरिकांना कर पावती आणा किंवा कर पावती भरा अशी समज दिली जाते.
    याकडे लोकप्रतीनिधीने दुर्लक्ष करून चालणा नाही.यावर हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे,असे सामान्य जनतेतून ऐकण्यात येत आहे.

 

वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या